मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

By : Polticalface Team ,14-11-2024

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड: ता १४ नोव्हेंबर २०२४.दौंड नगरपरिषदेतर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दौंड शहरातील विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आज बाल दिनाचे औचित्य साधून सायकल रॅली कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. श्री गणेश मरकड निवडणूक निर्णय अधिकारी १९९ दौंड विधानसभा मतदारसंघ आणि मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी बाल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. दौंड शहरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. सदर सायकल रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक -संत गाडगेबाबा चौक हुतात्मा चौक- कुरकुंभ मोरी-शालिमार चौक गोल राऊंड -अग्निशमन केंद्र दौंड या मार्गाने काढण्यात आली. सदर सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी दौंड नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी दिलीप रणदिवे, हनुमंत गुंड, शाहू महाराज पाटील, भाग्यश्री येळवे, सुधीर नाईक, स्मिता गाडे, ओंकार मेनसे, दत्तात्रय गदादे, दीपक म्हस्के, शुभम चौकटे, रवींद्र जाधव, संजय सावंत, हरेश बनसोडे, प्रवीण खुडे, हृतिक वाडिया तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.

शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद