By : Polticalface Team ,2024-11-26
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २६ नोव्हेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे माणकोबा वाडा साई नगर या ठिकाणी सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र संस्कार शाळा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.
मंगळवार दि. २६/११/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र संस्कार शाळेचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता या वेळी यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे हभप महादेव दोरगे महाराज सामाजिक कार्यकर्ते गणेश. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी मंगेश मोहन चव्हाण माऊली फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य. तानाजी संभाजी दिवेकर (संस्थापक अध्यक्ष, श्री रासाई देवी प्राथमिक आश्रम शाळा) नेते) भटके विमुक्त लोक कलावंत बहुउद्देशीय सेवा भावी संस्था, शेळके झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर. अशोकराव दिवेकर सुरज चोरगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले बालसंगोपन शिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी तानाजी गंगाराम चौगुले (सामाजिक कार्यकते) भटके विमुक्त लोककलावंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संचालीत अभिमान भगवान चव्हाण अर्जुन धोंडिबा चव्हाण आनंद सुदाम चव्हाण उपस्थित होते.
यवत या ठिकाणी सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र सुरू झाल्याने भटके विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे मोल मजरी रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यात आली आहेत यवत येथील इंदिरा नगर मार्केट कमिटी झोपडपट्टी या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे बेरोजगारी हातावर पोट भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागते पोटाच्या खळगीपाई मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते आता चिंता मिटली असुन शाळेची गैरसोय दूर झाली आहे. अशी प्रतिक्रिया स्थानिक भटके विमुक्त समाजातील नागरिकांनी व्यक्त केली
सावित्रीबाई फुले बालसंगोपन संस्कार शाळेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. सागर भगवान चव्हाण. उपाध्यक्ष श्री. रमेश अर्जुन चव्हाण. सचिव श्री. मोहन प्रकाश सावंत अधिक्षक श्री. मंगेश मोहन चव्हाण गोरख चिमाजी शेगर भगवान रामचंद्र चव्हाण भिमराव पिराजी आहेर माऊली फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य श्री.तानाजी संभाजी दिवेकर (संस्थापक अध्यक्ष, श्री रासाई देवी प्राथमिक आश्रम शाळा) नेते) आदी मान्यवर उपस्थित होते