अपघातात मृत्यू पावलेले आदित्य लष्करे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण ,राजेंद्र नागवडे यांच्याकडून लष्करे कुटुंबीयांचे सांत्वन
By : Polticalface Team ,02-12-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- संगमनेर जवळ भीषण अपघातात मृत्यू पावलेले लिंपणगावचे युवक आदित्य पंडित लष्करे यांच्या स्मरणार्थ लिंपणगाव येथे स्मशानभूमी व तुळजाभवानी मंदिराच्या प्रांगणात त्यांच्या कुटुंबीयांनी वृक्षारोपण करून स्तुत्य उपक्रम राबवला. दरम्यान आदित्य लष्करे याचे दिनांक 22 नोव्हेंबर रोजी संगमनेर जवळील साकोरी घाटामध्ये अपघातात नुकतेच निधन झाले होते. आदित्य लष्करे यांना वृक्षारोपणाची आवड होती. पावसाळ्यामध्ये आपल्या मित्रांना किमान एक झाड तरी लावा ही संकल्पना आदित्यची प्रत्येक वर्षी होती. शालेय स्तरावर तसेच मंदिराच्या प्रांगणामध्ये आदित्यने सतत वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देत विविध प्रकारचे वृक्ष लावून तरुणांसमोर एक आदर्श ठेवला होता. त्याची स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी स्मशानभूमी व तुळजाभवानी मंदिराच्या प्रांगणात दशक्रिया विधी दरम्यान वृक्षरोपण करून त्यानिमित्ताने आदित्यचे कायम स्मरण व्हावे. यासाठी वृक्षरोपण केले. विशेष म्हणजे आदित्यचा अंत्यविधी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांमध्ये चित्येची राख टाकून एक वेगळा अनोखा उपक्रम देखील यावेळी लष्करे कुटुंबीयांनी राबवला. या अभिनव उपक्रमाचे लिंपणगावकरांनी लष्करे कुटुंबीयांचे कौतुक केले आहे. हा उपक्रम इतरांनाही प्रेरणादायी असा ठरणार आहे.
दरम्यान संगमनेर जवळ झालेल्या अपघाती निधन प्रसंगी सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी. आदित्यच्या कुटुंबियांचे सांत्वन केले ज्या दिवशी संगमनेर जवळ आदित्य लष्करे यांचा अपघाती मृत्यू झाला त्यावेळेस नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधून लिंपणगाव येथील युवक आदित्य लष्करे यांच्या पुढील उपचारासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. त्यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ त्यांचे स्विये सहाय्यक भास्कर खेमनर यांनी संबंधित शासकीय रुग्णालयशी संपर्क साधून अपघातात मृत्यू पावलेल्या आदित्य लष्करे याची आरोग्य तपासणी व शवाविच्छेदनासाठी लष्करे कुटुंबीयांना राजेंद्र नागवडे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील बहुमोल सहकार्य केले. याबद्दल लष्करे कुटुंबियांनी श्री. नागवडे व माजी मंत्री थोरात यांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :