By : Polticalface Team ,2024-12-06
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
पुणे ता ६ डिसेंबर २०२४ डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आंदगाव विद्या विकस मंदिर विद्यालयातील विद्यार्थीनी संविधान उद्देशिकाचे वाचन करुन केले अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता आंदगाव येथील विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक सतीश सावंत सर यांनी दिली.
या प्रसंगी आंदगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रफुल्ल मारणे. सुशीला राजेंद्र हगवणे (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मुळशी ) यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्या विकस मंदिर आंदगाव येथील उपस्थित समस्त ग्रामस्थ मान्यवर आणि विध्यार्थी यांनी भारतीय राज्य घटनेतील उद्देशिकाचे वाचन करून. डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सतिश सावंत सर आणि सर्व शिक्षक/शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजे आंदगाव येथील कै.तुकाराम बुवा लक्ष्मण हगवणे माजी सभापती पं.स.मुळशी यांच्या स्मरणार्थ सुशील राजेंद्र हगवणे (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मुळशी) यांच्या तर्फे इयत्ता १० वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एकूण ३३ विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित प्रश्नसंच वाटप करण्यात आले. या वेळी आंदगाव येथील उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग ज्ञान सागराच्या लोक कल्याणकारी कार्याचा गौरव करुन महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन केले.
या वेळी सुशिल हगवणे व त्यांचे सहकारी पदाधिकारी तसेच आंदगावचे विद्यमान सरपंच प्रफुल्ल मारणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सतिश सावंत सर सर्व शिक्षक/शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी समस्त ग्रामस्थ मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.