By : Polticalface Team ,2024-12-06
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ६ डिसेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे पाटस ता दौंड जिल्हा पुणे येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार. डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन, या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती मयुर पानसरे यांनी दिली. ६ डिसेंबर १९५६ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन कल्याणकारी व सोशित पिढीत वंचित बहुजन समाज कार्याचा गौरव केला जातो तसेच महापरिनिर्वाण दिन देखील साजरा केला जातो,
पाटस येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या वेळी पाटस पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन अभिवादन केले
या प्रसंगी गावचे प्रतिष्ठित नागरिक डॉ.मधुकर आव्हाड, माजी पंचायत समिती अधिकारी तानाजी भोसले, पाटस ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तृप्ती दादा भंडलकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेशजी सोनावणे, प्रमोद नाना पानसरे शंकर अण्णा पवार, कृष्णा पानसरे, CWPRS चेअरमन प्रशांत भाऊ पानसरे, प्रमोद आखाडे, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष व बौद्धाचार्य संजय गायकवाड, अरुण पानसरे, सखाराम शिंदे, सुधीर पानसरे, सागर पानसरे, सुयश पानसरे, नितीन पानसरे , सचिन म्हस्के या भीम अनुयायांनी महामानवाला आदरांजली वाहिली. तसेच पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात जाऊन महामानवाला अभिवादन करण्यात आले