By : Polticalface Team ,2024-12-07
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ७ डिसेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण ता दौंड जि पुणे येथील थरारक घटनेने दौंड तालुका हादरला आहे हिंसक बिबट्याच्या हल्ल्यात लता बबन धावडे या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक प्रकार घडला या घटनेला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहत नाही. मानवांनी जंगल उध्वस्त केलं म्हणुन. मानवांशी वैर नाही. जंगली प्राणी आपल्या पोटाची भुक भगवण्यासाठी मानव वस्तीत शिरकाव करु लागली आहेत. यावर काही तरी उपाय योजना व्हायला हव्यात. नाही तर गरीब मजूर शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबाची वाताहत झाल्या शिवाय राहणार नाही. दौंड तालुका ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये चर्चा होत आहे जंगलातील हिंसक प्राणी श्वापदे मानव वस्तीत शिरकाव करत असल्याने ही मानवी जीवीतास धोक्याची घंटा आहे !
दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण परीसरातील नागरीक बिबट्याच्या हल्ल्याने भयभीत झाले आहेत काही दिवसांपूर्वीच यवत कासुर्डी हद्दीत रेल्वे अपघातामध्ये एका बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली तर बोरीपार्धी हद्दीत बिबट्याने सहा महिन्याच्या बाळाचा बळी घेतला. आज दि ०७ डिसेंबर २०२४ रोजी दौंड तालुका मौजे कडेठाण येथील शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेचा बिबट्यांने हल्ला करून बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे अनेक ठिकाणी मानवी वस्ती मध्ये मोकाट बिबट्यांचा वावर आढळून येत असल्याचे माध्यमातून स्पष्ट झाले आहे. वन्यप्राण्यांची हत्या कायद्याने बंधनकारक आहे मात्र मानवी जीवीतास देखील हिंसक प्राण्यांपासून सुरक्षा आवश्यक आहे. दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण येथील धक्कादायक घटनेची वार्ता ऐकून अनेक शेत मजूर महिला व शेतकरी हैराण झाले असून विचार करण्याची क्षमताच सुन्न झाली आहे.
हिंसक बिबट्या बनला नरभक्षक ! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू. आपल्या गावा जवळ घडलेली ही घटना वाचताच अंगावर शहारा आला. आपल्या परीसरात अशा दुर्घटना घडू नये या बाबत काही उपाय योजना करणे आवश्यक आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा प्रकारे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे माध्यमातून समोर आले आहे. आपल्या सभोवताली राण गव्याचा मानव वस्तीत शिरकाव होतोय बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी व पशुधनाच्या जीवीतास हाणी निर्माण झाली असून रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, तरसाच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू रस्त्यावर रात्री वाघ दिसला. अशा अनेक ठिकाणी घटना घडल्याचे आपण वर्तमानपत्रातून वाचत आहे. जेथे घटना घडत आहे. त्या ठिकाणी नागरिकांच्यात जागरूकता आणि भीती निर्माण होत आहे. परंतु वेळ निघुन जाते
मात्र पुन्हा हिंसक दुर्घटना घडली की जंगली प्राणी मानव वस्तीत घुसु लागले अशी चर्चा सुरू होते. याचे कारण शोधणे गरजेचे आहे. या बाबत उपाय योजना करणे आवश्यक आहे. चर्चा सुरू
सरकारी स्तरावर विशेष अंमल बजावणी करून वनविभागाकडे विशेष जबाबदारी सोपवून सामान्य नागरिकांच्यात या विषयावर जन जागृती करून काही तरी मार्ग शोधणे आवश्यक आहे. या संदर्भात माहिती असलेल्या तज्ञ अभ्यासकांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
वनविभागातील वरीष्ठ अधिकारी अनुभवी कर्मचारी यांची मदत घेऊन यावर काय करता येईल याचा विचार वनविभाग प्रशासनाने
करून जंगली श्वापदे जंगलात शिल्लक राहिले नसल्यामुळे हिंसक प्राणी मानव वस्तीतील व मेंढपाळांच्या वाड्यातील शेळी मेंढी कुत्री गाय म्हैस वासरे अशा पाळीव प्राणी व मानवांनवर हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान होणार नाही याची खात्री कोण देणार ? हे नाकारता येईल काय? असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहत नाही. हिंसक प्राण्यांच्या नजरेमध्ये मानवी सावज आल्यास ते माणसावर ही भीती पोटी किंवा भुकेपोटी हल्ला केल्या शिवाय करणार नाही
हे नाकारता येत नाही. हिंसक जंगली प्राण्यांपासून सावध व्हायला हवे घडलेल्या घटनेची हि चाहूल आहे कारण हि धोक्याची घंटा आहे.
परीसरातील जंगल संपलं ते राहिलं फक्त चित्रात आणि प्राणी ही दुर्मिळ झाले परंतु ज्या प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतीचा आडोसा घेऊन आणि ओढ्या नाल्या गायरानांचा आधार घेतला ते प्राणी आज मानव वस्तीत शिरकाव करत आपल्या पोटाची भुक भागवण्यासाठी येऊ लागले आहेत. याला जबाबदार ही माणुस आहे. आपले एखाद्याने घर उध्वस्त केल्यास आपण तत्काळ प्रतिकार विरोध केल्या शिवाय राहणार नाही. मानसांनी जंगलं नष्ट केली. जंगल घरं तोडली त्यामुळे प्राण्यांचे जीवन भुके वाचून संपुष्टात आले. जंगल (घर) आणि त्यांची होत असलेली उपासमार मानवाच्या जीवावर बेतू लागली आहे. हिंसक प्राणी
फक्त पोटाची भुक भागवण्यासाठी मानवाच्या वस्तीत येत आहे. त्याचे मानवाशी कुठलं वैर नाही. जंगल वन नाहिसे झाल्याने अनेक छोटे मोठे जंगली प्राण्यांची संख्या ही कमी झाली. त्यामुळे या मांसाहारी जंगली प्राण्यांचे भुके वाचून जीवन जगणे मुश्कील झाले त्यामुळे त्यांचा भूकेपोटी मानवी वस्तीत शिरकाव सुरु झाला आणि तो सातत्याने वाढत चालला आहे. उद्याचा काळ आणि वेळ मानवासाठी सुरक्षित असेल काय ? असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहत नाही
सरकारने व वनविभाग प्रशासनाने यावर विशेष मोहीम राबवावी अनुभवी वनपाल कर्मचारी यांची मदत घ्यावी. सामाजिक संस्था यांनाही समाविष्ट करावे प्राणी व मानवांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ नये या दृष्टीने दक्षता बाळगावी अधिक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची जन लोकांमध्ये जागृती करून
या कार्याला सहकार्य करावे. जंगली प्राण्यांचा हिरावून घेतलेला आदीवास पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा तरचं हा जंगली प्राण्यांचा वाढत चाललेला शिरकाव आटोक्यात येऊ शकेल या संदर्भात राज्य वनविभाग प्रशासनाने सार्वत्रिक माध्यमांच्या सहाय्याने प्रसार प्रचार करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हिंसक जंगली प्राणी मानव वस्तीत आल्यास घ्यावयाची काळजी तसेच त्याला मानव वस्तीतून दूर करण्यासाठी काही उपाययोजना जनजागृती तर व्हायला हवी. नाही तर विनाकारण शेतकरी, सर्वसामान्य गरीब शेत मजुरांच्या कुटुंबाची वाताहत होईल कारण हि तर धोक्याची घंटा आहे सावध व्हायला हवे.