विधानसभेत आमदार ओगलेंची दमदार एंट्री शपथ घेतांनाच श्रीरामपूर जिल्ह्यासाठी वेधले लक्ष

By : Polticalface Team ,09-12-2024

विधानसभेत आमदार ओगलेंची दमदार एंट्री शपथ घेतांनाच श्रीरामपूर जिल्ह्यासाठी वेधले लक्ष

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - विधान भवनामध्ये सुरू असलेल्या आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमात श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार हेमंत ओगले यांनी शपथ ग्रहण करतानाच श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीची टोपी घालून सभागृहासह राज्याचे लक्ष वेधून घेतले व भविष्यामध्ये आपण मतदार संघासाठी करणार असलेल्या कामाचा श्री गणेशा केला.
काल सकाळी 11 वाजून 36 मिनिटांनी शपथ ग्रहणासाठी हेमंत ओगले यांचे नाव पिठासन अधिकारी कालिदास कोळंबकर यांनी पुकारताच शपथ घेण्यासाठी आमदार हेमंत ओगले हे डोक्यावर गांधी टोपी घालून व्यासपीठावर आले.टोपीवर श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे असे घोषवाक्य दोन्ही बाजूने लिहिलेले होते.सोबत संविधानाची प्रत देखील त्यांनी आणली होती.श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी करत त्यांनी आमदारकीची शपथ घेतली.त्यांच्या टोपीने संपूर्ण सभागृहाचे तसेच टीव्हीवर शपथ ग्रहण समारंभ पाहणाऱ्या राज्यभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.

१९९३ साली सोनई येथे झालेल्या सभेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा केली होती.त्यानंतर सर्व श्रीरामपूरकर हे आपल्या जिल्ह्याचे स्वप्न साकारण्याची वाट पाहत आहेत.मागील ४० वर्षात या प्रश्नावर अनेक वेळा राजकारण झाले.श्रीरामपूरचे नेते माजी मंत्री कै.गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपूर जिल्ह्याची पायाभरणी भक्कमपणे करून ठेवली आहे.माजी आमदार जयंत ससाणे यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भरघोस योगदान दिले. परंतु हे दोन्ही नेते निघून गेल्यानंतर या प्रश्नाची धार थोडी कमी झाल्यासारखे वाटले. त्यातच शेजारील राहत्याचे राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री,महसूल मंत्री झाल्यानंतर त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे नेले.त्यासाठी इमारतीचे काम देखील सुरू झाले आहे. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा होणार की नाही याबद्दल आता साशंकता निर्माण झालेली असताना श्रीरामपूरचे नूतन आमदार हेमंत ओगले यांनी काल अचानकपणे विधान भवनामध्ये आमदार शपथविधी कार्यक्रमांमध्ये श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे हे वाक्य लिहिलेली गांधी टोपी परिधान करून आपल्या आमदारकीची शपथ घेतली व श्रीरामपूरच्या विकासासाठी आपण पहिल्या दिवसापासून कटिबद्ध आहोत असा संदेश तालुक्याला व राज्याला दिला. आमदार हेमंत ओगले यांच्या या कृतीने संपूर्ण श्रीरामपूर मतदारसंघातील मतदार सुखावले आहेत आणि आपला निर्णय योग्य आहे.आपण योग्य माणसाची निवड केली असा आशावाद त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसापासून श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आंदोलने सुरू आहेत.परंतु या आंदोलनामध्ये पाहिजे तेवढा दम नाही. दोन गटांकडून हे आंदोलने होत असल्याने आणि त्यातही राजकारण अधिक दिसत असल्याने  त्याला सर्व श्रीरामपूरकरांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.मात्र आता आमदार हेमंत ओगले यांनी या प्रश्नाला चालना दिली आहे.
श्रीरामपूर जिल्ह्यासाठी होत असलेल्या आंदोलनामध्ये तत्कालीन लोकप्रतिनिधी माजी आमदार लहू कानडे यांचा सक्रिय सहभाग नव्हता. त्यांनी या प्रश्नावर विधानसभेत कायदेशीर मार्गाने आवाज उठवला खरा. परंतु जन आंदोलनामध्ये ते सक्रिय नव्हते. त्याबरोबरच गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधाताई आदिक व सुपुत्र अविनाश आदिक हे देखील या आंदोलनामध्ये फारसे सक्रिय झाले नाहीत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय नेल्याने त्यांचे भाजपचे तालुक्यातील कार्यकर्ते देखील फार मनाने आंदोलनात नाहीत. हे सर्व पाहता श्रीरामपूर जिल्ह्याचे स्वप्न साकार होणार का नाही असा प्रश्न प्रत्येक श्रीरामपूरकर विचारीत आहे.परंतु आमदार हेमंत ओगले यांनी काल विधान भवनामध्ये या प्रश्नाला अनोख्या पद्धतीने वाचा फोडली. त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपूर जिल्हा होणार ही आशा पल्लवीत झाली आहे.
श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी मतदारसंघातील सर्वांनी आपले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जोरदार आंदोलन करणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार हेमंत ओगले यांनीच पुढाकार घ्यावा व त्यांच्या नेतृत्वाखालीच हे आंदोलन उभे राहावे. त्यासाठी तालुक्यातील व शेजारच्या तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना साथ द्यावी अशी आशा आणि अपेक्षा श्रीरामपूरकर व्यक्त करीत आहेत.

श्रीरामपूरच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य घ्या

आमदार हेमंत ओगले हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. सध्या काँग्रेस पक्षाचे राज्यभरातून फार कमी आमदार निवडून आलेले आहेत.विरोधी पक्षाचे आमदार असल्याने शासनाकडून निधी मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आगामी पाच वर्षात श्रीरामपूरसाठी तीन हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिलेले आहे.हा निधी प्राप्त करण्यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींची गरज भासणार आहे. तसेच महायुतीतील शिंदे सेना व भाजपाच्या नेत्यांची देखील आवश्यकता भासणार आहे. श्रीरामपूरच्या विकासासाठी आमदार ओगले यांनी पक्षीय निवेश बाजूला ठेवून तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करावा अशी अपेक्षा श्रीरामपूर मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
माजी आमदार जयंत ससाणे यांनी तालुक्यात काम करताना निवडणुकीपुरते राजकारण व नंतर समाजकारण हे तत्व स्वीकारित सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते यांचे सहकार्य घेत आपली वाटचाल यशस्वी केली होती.त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आमदार ओगले यांनी देखील राज्य शासनातील जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य घेऊन तालुक्याचा विकास करावा.श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आणावेत. तरुणाईला रोजगार उपलब्ध करण्यासाठी तालुक्यात नवीन प्रकल्प आणावेत.राहुरी फॅक्टरी ते कोपरगाव चौफुली पर्यंतचा रस्ता चौपदरीकरणासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा देखील तालुक्यातील मतदारांनी व्यक्त केली आहे.
विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात करताना पहिल्याच दिवशी श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नावर आवाज उठवून जनतेच्या मनातील आमदार म्हणून हेमंत ओगले यांनी जे पाऊल उचलले त्याबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

मढेवडगाव चे प्रगतशील शेतकरी राजेंद्र शिंदे यांना आंबा उत्पादक संघाचा आदर्श शेतकरी पुरस्कार

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मानवतेचा व समानतेचा- प्रा.अफसर शेख

कोशिमघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम.आनंदी बाजार मेळावा घेऊन बाल विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे दिले धडे.

जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश - प्रा.युवराज पाटील * छत्रपती शिवाजी महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन

दौंड शहर भिमनगर येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेतील नवयुग वस्तीगृहातून ७ वी मध्ये शिकत असलेला १२ वर्षाचा विद्यार्थी बेपत्ता. आई वडील झालेत हैराण.

वांगदरी सेवा संस्थेचे अध्यक्षपदी राजेंद्र निळकंठ नागवडे यांची निवड

सरावानेच खेळाडू घडत असतो - सूनीलराव जाधव (श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते)

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल चे विद्यार्थी खर्ची बंधूंचे ट्रेडिशनल रेस्टलिंग चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश

मुक नायक स्थापना ३१ जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे. बहुजन पत्रकारांनी डॉ बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य. प्रा. सदाशिव कांबळे.

पत्रकार माधव बनसुडे व त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी बनसुडे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान

शेतातील शेतगड्याने मालकाच्या परस्पर घरातील महत्वाच्या वस्तू घेऊन गेला पळून. मळद येथील घटना दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील (बोरीबेल) गाडेवाडी येथे भर दिवसा घरफोडी चोरीची घटना. १० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.

छत्रपती महाविद्यालयाचा राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्र राज्यातील विविध कॉलेजचे ८०० विद्यार्थी आणि २०० समन्वयक व प्राचार्य यांचा सहभाग.

लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त व्याख्यानमाला

जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.

अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा