By : Polticalface Team ,2024-12-13
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १३ डिसेंबर २०२४ दौंड तालुका यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अंतर्गत पाटस येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरी समाज बांधवांनी परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना निषेधार्थ पाटस पोलिस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिले. परभणी येथील जिल्हा अधिकारी कार्यालय समोर असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असल्याचे दिसून येत आहे. परभणी या ठिकाणी घडलेल्या अवमानाच्या निषेधार्थ व युवा भिम सैनिकांची पोलीसांनी केलेली बोकिंग कारवाई संदर्भात जाहिर निषेध व्यक्त केला आंबेडकरी समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचे षडयंत्र सफल होऊ दिले जाणार नाही. भिम सैनिक भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत राहून मनूवादी षडयंत्र हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही. हे मनूवादी समाजाने समजून घेणे आवश्यक आहे. अशा घटना वेळोवेळी घडत आहेत. भारत स्वातंत्र्याच्या पूर्वी पासून १८१८ मध्ये घडलेल्या भिमा कोरेगाव येथील युद्धाचा इतिहास ब्रिटिशांनी लिहून ठेवलाय महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिऊन आम्ही अमर होणार नव्हतो मानव हक्काचा तो लढा होता. नाशिक येथील काळाराम मंदिरात आम्ही प्रवेश केल्यावर काळाराम प्रसन्न होणार नव्हता. तो देखील आमच्या साठी मानव हक्काचाच लढा होता येरवडा जेल मधील झालेला पुणे करार ही एक तडजोड होती. समाजच राहिला नाही तर लढा कोणासाठी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पटत नसताना देखील पुणे कराराची तडजोड करावी लागली. विषमतेचा व अस्पृश्यांचा लढा पुर्वी पासुन ते आज पर्यंत सुरू आहे. परभणी येथील मनुरुग्नाला अटक केली मात्र या षडयंत्राचा मुख्य सुत्रधार कोण आहे याचा शोध पोलीस प्रशासनाने करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आंबेडकरी संघटना पेटून उठल्या शिवाय राहणार नाही अशी परिस्थिती राज्यात निर्माण होण्यास वेळ देखील लागणार नाही. याचे पोलीस प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन परभणी येथील बिघडलेली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करावा.अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली असून मनुवादी बडव्याला तत्काळ अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कायदेशिर कारवाई करावी, या घटनेमागे कोणती संघटना काम करत आहे. याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच या घटने नंतर आंदोलन करणाऱ्या भीम अनुयायी यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आले आहेत असुन या पुढे असे प्रकार घडले तर महाराष्ट्रातील बहुजन भीम सैनिक हे खपवून घेणार नाही रस्त्यावर येवून तीव्र आंदोलन करतील अशी प्रतिक्रिया युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे .
परभणी येथे एका मनुवादी समाज कांटकाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड करुन विटंबना केली या घटनेने तमाम भारतीयांची तसेच आंबेडकरी जनतेची भावना दुखावली गेली. भारतीय संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान होय. असे कृत्य करणाऱ्या मनुवादी समाज कंटकाला तत्काळ अटक करून त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच या घटने नंतर आंदोलन करणाऱ्या परभणी येथील भीम अनुयायी यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित रद्द करावे असे निवेदन पाटस पोलीस स्टेशन येथे देण्यात आले. असुन सदर घटनेच्या निषेधार्थ पाटस येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे.दि १२ डिसेंबर २०२४ रोजी पाटस गावातील सर्व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल युवक मंडळ, पाटस. तक्षशिला बुध्द विहार पाटस (पंचशील नगर) येथील भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेतृत्व युवा कार्यकर्ते मयुर पानसरे ,सुरज पानसरे, सागर पानसरे, शिवधन पानसरे, भूषण पानसरे,तेजस पानसरे, प्रणय काकडे, सुयश पानसरे, निलेश पानसरे, विक्रांत पानसरे, मुबिन बागवान यांनी केले या प्रसंगी जेष्ठ सदस्य कृष्णा पानसरे, दत्तात्रय कोकाटे, विजय पानसरे, प्रमोद आखाडे, रणजित पाडळे तसेच राहुल युवक मंडळ तक्षशिला बुध्द विहारचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.