By : Polticalface Team ,14-12-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)--श्रीगोंदे येथील श्री छत्रपती शिवाजी महविद्यालयातील भूगोल विभागात डॉ. संदिप मारूती कदम हे अध्यापन करत आहेत. नुकतीच त्यांना प्राध्यापकपदी बढती मिळाली आहे. सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी २००७ मध्ये अद्यापनास सुरुवात केली व सध्या त्यांची महविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील उच्च अश्या प्राध्यापकपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निवड समितीने पदोन्नती दिली आहे. याबद्दल त्यांचे अनेक स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे. खरातवाडी येथील मारुती कदम यांचे ते पुत्र आहेत.
महविद्यालयात कार्यरत असताना त्यांनी अनेक पदांवर काम केले. भूगोल विषयाच्या अध्यापनबरोबरच महविद्यालयीन परीक्षा अधिकारी म्हणून ते काम करत आहेत. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी या पदावर काम केले आहे. भूगोल विषयातील तीन संदर्भग्रंथ प्रकाशित झाले असुन,पेटंट,राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार आणि आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड,सर्व विश्वस्त, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, भूगोल विभागप्रमुख प्रा. बाळकृष्ण महारनोर, सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :