जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.
By : Polticalface Team ,14-01-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी)- दि. १० जानेवारी रोजी 2024 रोजी जि. प.प्रा. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये लोणी परिसरातील कलाश शाळा, जि.प शाळा मडकेवाडी, नगरेवाडी, महादेववाडी, साळवे-खेडकरवस्ती या शाळांनी उत्फूर्त सहभाग घेतला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी गावचे पो. पाटील व मा उपसभापती मनेष जगताप पाटील होते. या याप्रसंगी शाळेमध्ये फ्लेक्स; फुगे; रांगोळी मंडप लावून सजावट करण्यात आली होती. शाळेला नेहमी सहकार्य करणारे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश काकडे व सर्व सदस्य उपस्थित होते. जि. परिषद् शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. बालवयात विद्याध्याची गुणवत्ता व व्यवहारीक ज्ञान वाढवण्यासाठी जि.प. शाळेमध्ये प्रयत्न केले जातात.तर आनंददायी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकास होण्यासाठी मदत होते. असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. रामदास ठाकर सर यांनी व्यक्त केले., या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मनेष जगताप पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सर्व आयोजकांचे अभिनंदन केले. आणि विद्यार्थीना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य पुराणे सर; श्री. गौतम साळवे सर, श्री. संतोष खोमणे सर यांनी मनोगत व्यक केले; व शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रास्ताविक श्री. नवले सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. श्रीकृष्ण कुलकर्णी सर व भाऊसाहेब दातीर सर यांनी केले तर आभार श्रीमती विजया खामकर यांनी मानले.
याप्रसंगी दैनिक. लोकमतचे जेष्ठ पत्रकार श्री बाळासो काकडे , दैनिक राष्ट्रसह्याद्रीचे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरूमकर आवर्जून उपस्थित होते.
वाचक क्रमांक :