लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त व्याख्यानमाला
By : Polticalface Team ,15-01-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) लोकनेते, मा. आ. शिवाजीराव नागवडे (बापु) यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त महाविद्यालयात मागील 16 वर्षांपासून व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या वर्षी दि. 17.01.2025 ते 19.01.2025 या कालावधीत सकाळी 10.30 वाजता या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेसाठी महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यात्यांना आमंत्रित केले जाते. हे व्याख्याते विद्यार्थी व पालकांना ज्ञान प्रबोधन करतात.
तसेच महाविद्यालयाचा 44 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि. 20.01.2025 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित केला आहे.
तरी वरील सर्व कार्यक्रमांना आपण उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :