पत्रकार माधव बनसुडे व त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी बनसुडे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान
By : Polticalface Team ,16-01-2025
श्रीगोंदा प्रतिनिधी:- अ.नगर येथे दरवर्षी होणाऱ्या सावित्री ज्योती महाउत्सोहाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षी रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी कोहीनुर मंगल कार्यालय गुलमोहर रोड अहिल्यानगर येथे स्वागताध्यक्ष किशोर डागवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महाउत्सोहात श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते व दैनिक लोकमथंन/रयत समाचार चे पत्रकार श्री माधव शिवराम बनसुडे सह त्यांच्या पत्नी सौ शुभांगी माधव बनसुडे यांना खासदार निलेश लंके शहराध्यक्ष किशोर डागवले कलाकार मोहीनीराज गटणे यांच्या हस्ते राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार 2025 (पैठणी साडी, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) देऊन सन्मानित करण्यात आले.पत्रकार माधव बनसुडे सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर विषयांवर आवाज उठवुन सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करत असतात. ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई श्रीगोंदा तालुका अध्यक्ष, श्रीगोंदा तालुका वृत्तपत्र विक्रेते श्रमिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था संचालक,व प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.श्री. माधव बनसुडे व त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी बनसुडे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
वाचक क्रमांक :