By : Polticalface Team ,16-01-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) गुरूवार दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. जिमखाना डे चे आयोजन केले. सदर कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा लेखाजोखा मांडला तसेच सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे तथा बापुच्या कार्य कर्तृत्वाचा आलेख मांडला. ग्रामीण उन्नतीसाठी निर्माण केलेल्या महाविद्यालयाचा गुणात्मक विकास केला आहे. आज महाविद्यालय अग्रक्रमाने बौद्धिक परिपक्वता निर्माण करत त्यामुळे क्रीडा व नोकरीत विद्यार्थी अव्वल ठरले आहेत.प्रा.सतीश चोरमले यांनी अतिथीचा परिचय करून दिला.
प्रमुख अतिथी सूनीलराव जाधव (श्री.शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त) हे होते. त्यांनी बोलताना श्री छत्रपती महाविद्यालयातील क्रीडा मैदानाचा व खेळल्या जाणाऱ्या खेळाचा गौरव केला. सरावाने खेळाडू तयार होत असतात त्यामुळे विद्यार्थ्यानी
सराव करून स्पर्धेत भाग घ्यावा.आज खेळातून प्रतिष्ठा व पैसे मिळून आपले आयुष्य सुखदायी व चांगलं होऊ शकते त्यामुळे खेळाकडे लक्ष द्यावे अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुभाषराव l शिंदे (माजी व्हा.चेअरमन तथा विद्यमान संचालक) हे होते. त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय सुरू होण्यात बापूंनी केलेल्या अथक परिश्रमाची जाण करून दिली.महाविद्यालयाचा नावलौकिक असाच ठेवावा ही अपेक्षा त्यांनी केले.
प्रमुख पाव्हणे श्रीनिवास घाडगे यांनी आपल्या उद्भोदनात सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे तथा बापू यांचे नेतृत्व सांगत माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीवर मोठा विश्वास ठेवला. माझ्या घडणीत बापूंच्या विश्वासाचा आधार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शंकर गवते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.प्रवीण टकले यांनी मानले. या कार्यक्रमानंतर दुपारी २.०० वा. प्रश्नमंजुषा कार्यक्रम झाला तसेच शेला पागोटे व रांगोळी स्पर्धा हे उत्साहपूर्वक साजरे झाले.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बंडोपंत जगताप हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी प्रा.सुरेश रसाळ(संचालक),उपप्राचार्य प्रा.चंद्रभान कतोरे, प्रा.प्रवीण टकले,डॉ.प्रमोद परदेशी,संदिप जाधव,प्रा.भावसार सर, प्रा.सतीश चोरमले, प्रा.महेश गिरमकर,वरिष्ठ व कनिष्ठ प्रध्यापक,शिक्षिकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :