जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश - प्रा.युवराज पाटील * छत्रपती शिवाजी महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन

By : Polticalface Team ,17-01-2025

जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश - प्रा.युवराज पाटील * छत्रपती शिवाजी महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन लिंपणगाव (प्रतिनिधी )लोकनेते मा.आ.स्व. शिवाजीराव (बापू) नारायणराव नागवडे यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त लोकनेते मा.आ.स्व.शिवाजीराव (बापू) नारायणराव नागवडे प्रतिष्ठान व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्याकरता प्रेरणादायी वक्ते म्हणून युवराज पाटील उपस्थित होते. सदर व्याख्यानमालेचे प्रास्ताविक डॉ.धर्मनाथ काकडे यांनी केले तर त्यांनी प्रास्तविक करताना,बापूंनी केलेले सामाजिक,शैक्षणिक व राजकीय कार्याची ओळख करून दिली. व्याख्यात्यांची ओळख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी करून दिली. व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते युवराज पाटील यांनी "भविष्य उज्ज्वल आहे" या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी अनेक प्रेरणादायी व्यक्तींचा प्रवास किती खडतर प्रवासातून झालेला आहे याची जाणीव करून दिली.उज्वल भविष्यासाठी योग्य व काळानुसार स्वप्न असले पाहिजे. क्षमता आणि मर्यादा योग्य वयात समजल्या पाहिजे.मन, मनगट आणि मेंदू आपल्या ताब्यात पाहिजेत.सयंम,जबाबदारी,नम्रता,चारित्र्य व आईवडीलांचे आदर्श खुप महत्त्वाचे आहेत.विद्यार्थ्यांनो स्वप्नांच्या पाठीमागे निष्ठावान होऊन धावलात तर आपले भविष्य उज्वल आहे.क्षमता व मर्यादा योग्य वयात मिळाव्यात,प्रामाणिक प्रयत्नात यश दडलेले आहे.बापाला मारलेली मिठी ही जगात सर्वात मोठे यश आहे. सदर व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष म्हणून सौ.अनुराधाताई राजेंद्र नागवडे या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यानी जीवनाकडे बघत असताना सर्वांगीण अंगाने विचार करा.आपण खुप कष्ट करा. मदत करणाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडवावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.आभार प्रदर्शन प्रा.बाळासाहेब महारनुर यांनी केले तर प्रा.शंकर गवते व प्रा.लोखंडे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी रांगोळी स्पर्धा,सलाड मेकिंग स्पर्धा,पाक कला स्पर्धा,मेहंदी स्पर्धा व आनंदी बाजार खुप आनंददायक साजरा झाला. या कार्यक्रमासाठी मा.अनुराधाताई नागवडे उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत सुरेखाताई लकडे,मनीषा मुथा,सोनाली जामदार उपस्थित होत्या. तसेच आनंदी बाजार या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भाऊसाहेब नेटके (संचालक) व प्रवीण लबडे (संचालक) उपस्थित होते.त्यांनी आनंदी बाजारमध्ये सहभागी विद्यार्थ्याना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे गुणगान केले. या व्याख्यानमालेसाठी कारखान्याचे संचालक विठ्ठल जंगले, योगेश भोईटे, सुरेश रसाळ,विजय मुथा,सुरेखाताई लकडे, धनसिंगपाटील भोईटे,विलास काकडे,मनीषा मुथा,अमोल लगड,मधुकर काळाने,सोनाली जामदार, दिनेश आदलिंगे हे उपस्थित होते.तसेच श्रीगोंद्यातील नागरिक विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, प्राध्यापक, प्रध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.