By : Polticalface Team ,18-01-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी)
मढेवडगाव तालुका श्रीगोंदा येथील प्रगतिशील शेतकरी श्री राजेंद्र आनंदराव शिंदे यांना महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघांचा आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.आज मुंबई मध्ये त्यांना मा श्री चंद्रकांत मोकल यांच्या शुभहस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन व विद्यमान संचालक मा श्री सुभाष काका शिंदे यांचे ते बंधू आहेत. राजेंद्र शिंदे हे द्राक्ष, सिताफळ उत्पादन करणारे एक अभ्यासू शेतकरी आहेत. त्यांनी डाळिंब आणि द्राक्षे पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊन आदर्श निर्माण केला आहे.सेवा निवृत्त कृषी अधिकारी श्री शिवाजीराव शिंदे हे त्यांचे जेष्ठ बंधू आहेत. या पूर्वी राजेंद्र यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी पुरस्कार, अग्निपंख फौंडेशन चा देखील कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या प्रसंगी श्री सुभाष काका शिंदे, सौ अश्विनी राजेंद्र शिंदे, गौरव शिंदे, गौरी शिंदे आदी उपस्थित होते.
आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस आदींसह नागवडे कारखान्याच्या संचालक मंडळाने व तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :