By : Polticalface Team ,19-01-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १९ जानेवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे
पाटस येथील भुमिपुत्र श्री-जितेंद्र शिवाजी पानसरे यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्थानिक नागरीकांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
यावेळी पाटस येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी पाटस गावातील सर्व समाजबांधव ग्रामस्थ नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक मा जितेंद्र शिवाजी पानसरे हे सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत. यांनी बऱ्याच वर्षां पासून महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये चोख कामगिरी बजावली असून कर्तव्यामध्ये कुठलीही कानकसर न ठेवता अतिशय प्रामाणिकपणे कर्तव्यनिष्ठ जबाबदारी सांभाळली आहे त्यांनी खूप मेहनतीने व कष्टाच्या जोरावर सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदोन्नतीवर पोहोचले आहेत. या बाबत पाटस येथील गावकऱ्यांना सार्थ अभिमान असल्याचे बोलले जात आहे
त्यांच्या या कार्याचा गुणगौरव सोहळा पाहता निश्चित पानसरे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे नक्किच पानसरे परिवाराचा मान देखील उंचावला असुन स्वाभिमान असल्याचे दिसून येत आहे.
गावकऱ्यांच्या या सत्कार कार्याने पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे भाऊं भारावून गेले मात्र त्यांनी समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज बांधवांना संदेश दिला आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मुल मंत्र घेऊन आपल्या आयुष्यातील उन्नतीच्या मार्गाने पुढील काळात वाटचाल करावी अशी प्रतिक्रिया
युवा सामजिक कार्यकर्ते मयुर विश्वनाथ पानसरे तसेच सुधीर तुकाराम पानसरे यांनी व्यक्त केले आहे
पाटस येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन तक्षशिला बुध्द विहार राहूल युवक मंडळाचे सर्व कार्यकारिणी सभासद पदाधिकारी यांनी केले होते.
वाचक क्रमांक :