खडकी शितोळे वस्ती या ठिकाणी भरधाव वेगाने मोटर सायकल ला ठोस दिल्याने. एस आरपी जवानाचा जागीज मृत्यू. अज्ञात वाहनासह चालका विरुद्ध गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,23-01-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २२ जानेवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे खडकी ता दौंड जिल्हा पुणे हद्दीतील शितोळे वस्ती या ठिकाणी दिनांक 08/01/2025 रोजी दुपारी 2.00 वाजे सुमारास दौंड बाजुकडे जात असताना अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने मोटार सायकल चालकास ठोस दिली यामध्ये सुदाम दिंगबर मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस दलातील जवान सुदाम दिंगबर मोरे वय 57 वर्ष हे पूर्वी एस आर पी ग्रुप नं 5 दौंड येथे नोकरीला होते
फिर्यादी नाव व पत्ता विश्वास सुदाम मोरे वय 21 वर्षे धंदा शिक्षण रा कनक रेसीडेंन्सी बी 9 संस्कार नगर दौड ता.दौड जि.पुणे. यांच्या फिर्यादी वरून दौड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 48/2025 भारतीय. न्याय. संहिता. कलम, 281,125 (a), 125 (b), 106,324 (4) मो.वा. का.क 184, 134, 177 अंन्वये अज्ञात वाहना वरील अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हकीकत समक्ष दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत रावणगांव पोलीस दुरक्षेत्र हद्दीत खडकी शितोळे वस्ती या ठिकाणी अपघात झाला
सुदाम दिंगबर मोरे वय 57 वर्ष हे पूर्वी एसआरपी ग्रुप नं 5 दौंड येथे नोकरीला होते आठवडयातुन एक दोन दिवस आमचेकडे दौडला येत असत. पुर्वी त्यांची ठाणे पोलीस दलात बदली झाली होती. दिनांक 08/01/2025 रोजी सकाळी 10 वाजे सुमारास
मी व आई बहीण असे आम्ही सगळे घरात असताना माझे वडील सुदाम मोरे यांनी त्यांची सिडी डॉन मोटार सायकल नं.एमएच 42.2085 हिचे वरुन आमच्या मुळ गावी वायसेवाडी खेड ता.कर्जत जि.अहिल्यानगर येथे त्यांचे आई वडीलांना भेटाय जात असल्याचे सांगुन घरातुन गेले होते.
माझी आई व बहीण असे आम्ही घरात असताना दुपारी 12.30 वाजे सुमारास वडीलांचा घरी पोचलो बाबत आई च्या मोबाईल वर कॉल आला. त्यावेळी आई- वडील व आजी आजोबांबरोबर बोलणे झाले त्या ठिकाणी वडीलांनी थोडावेळ थांबुन त्यांची बहीण सौ सुनंदा अशोक काळे रा खडकी ता दौंड जि पुणे हीची गाठभेट घेवुन येतो असे बोलताना सांगितले.
दुपारी 02.00 वाजे सुमारास माझी मावशी राणी कल्याण वाकळे रा पंचगंगा अपार्टमेंट गोपाळवाडी रोड दौंड ही आमचे घरी आली तेव्हा तीच्या मोबाईवर (मामा) देवीदास कल्याण वाकळे याचा कॉल आला. सुदाम दिंगबर मोरे यांचा खडकी गावाजवळ अपघात झाला असुन ते जागीच मयत झाले आहेत असे सांगितले
वरुन आमचे घरातील आई व बहीण तसेच मावशी असे आम्ही सगळे वायसेवाडी ता.कर्जत जि अहिल्यानगर येथे गेलो. रात्री सुमारे 10 वाजे सुमारास वडीलांचे प्रेत घरी आले. आमचे जाती धर्माचे रितीरिवाजा प्रमाणे त्यांचे प्रेतावर अत्यविधी करण्यात आला
चुलते पांडुरंग दिगंबर मोरे यांच्याकडुन समजले की,माझे वडील हे दि 08/01/2025 रोजी दुपारी 02.00 वाजे सुमारास आमचे वायसेवाडी ता.कर्जत जि अहिल्यानगर येथुन दौड ला खडकी मार्गे सोलापुर ते पुणे हायवे रोडने जात असताना त्यांचे मोटार सायकल ला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने ते मोटार सायकल सह रस्त्यावर पडले त्या अपघातात त्यांच्या डोक्याला हाताला गंभीर व किरकोळ दुखापत होवुन ते उपराचारा पुर्वीच मयत झाले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे
दिनांक 08/01/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता चे सुमारास माझे वडील सुदाम दिंगबर मोरे हे सोलापुर ते पुणे हायवे ने वायसेवाडी ता.कर्जत जि अहिल्यानगर येथुन खडकी ता.दौंड मार्गे शितोळेवस्ती येथे त्यांचे ताब्यातील सिडी डिलक्स मोटार सायकल नं. एम एच 42. 2085 ही चालवित असताना त्यांचे मोटार सायकल ला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करुन भरधाव वेगात चालवुन अपघात करुन माझे वडीलांचे हाताला व डोक्याला गंभीर व किरकाळ दुखपती करुन त्यांचे मरणास व त्यांचे मोटार सायकल चे नुकसानीस कारणीभुत झाला म्हणून माझी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालका विरुध्द तकार आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रावणगाव पोलीस चौकी अॉक्रन्स नं 04/2025 वरून आल्याने दाखल पो ना रोटे. पुढील तपास पो ना पानसरे करीत आहेत
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे