By : Polticalface Team ,26-01-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज लोणी व्यंकनाथ येथे बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री सात ते दहा या वेळेत विविध नृत्य सादर करून गीत; लावणी; कोळीगीत नाटक; भक्ती गीते; मराठी; हिंदी चित्रपट गीते; रिमिक्स असे विविध नृत्य प्रकार विद्यार्थ्यांनी साजरे केले. या संस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते दिग्विजयसिंह नागवडे; स्कूल कमिटीचे अध्यक्ष संचालक डी आर आबा काकडे; माजी संचालक विलासराव काकडे पुरुषोत्तम बापू लगड आदींसह प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर अशी नृत्य गीते साजरी करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक अभिषेक उदमले तुषार नागवडे सर्व शिक्षक व प्राचार्य श्री पुराने सर यांनी अथक परिश्रम घेतले. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करत बक्षिसांचा व अक्षरशः वर्षावच केला. कार्यक्रम सांगता प्रसंगी लोणी व्यंकनाथ च्या ग्रामस्थांनी कलाशिक्षक अभिषेक उदमले व प्राचार्य श्री पुराने सर यांचा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल यथोचित सन्मान केला.
विशेष म्हणजे विद्यालयाचे प्राचार्य पुराने सर यांनी कार्यक्रम समारोपानंतर ज्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी अडचणी आल्या त्यांना घरपोच केले. ज्येष्ठ शिक्षक संतोष शिंदे व मनोज कांबळे यांनी शालेय शिस्त अबाधित ठेवली या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य अजित काकडे; नीलिमा थोरात; तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव मगर; माजी संचालक दिलीप काकडे; उपसरपंच हनुमंत मगर; स्कूल कमिटीचे सर्व सदस्य; राहुल गोरखे; गणेश काकडे; बंडू खंडागळे; आदींसह ग्रामस्थ आजी माजी विद्यार्थी ग्रामस्थ महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शालेय विद्यार्थिनी ऋतुजा कांडेकर; प्रतीक्षा साळवे; ज्येष्ठ शिक्षक एस पी इथापे; व प्रा निसार शेख आदींनी केले. उपस्थित प्रेक्षकाचे प्राचार्य ए एल पुराने सर यांनी मानले.
वाचक क्रमांक :