सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह. सा. का‌ अंतिम भाव ३०५० रु. देणार. चांगले गाळप झाल्यास आणखी विचार करू. ---- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,2025-01-27

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह. सा. का‌ अंतिम भाव  ३०५० रु.  देणार.   चांगले गाळप झाल्यास आणखी विचार करू.  ----    अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

लिंपणगाव ( प्रतिनिधी )सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन 2024 -- 25 या चालू गळीत हंगामात गळितास आलेल्या उसास तीन हजार पन्नास रुपये प्र. मे. टनाप्रमाणे अंतिम ऊस भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली. 
         प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की,  सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आतापर्यंत कधीही मागे राहिलेला नाही.  सातत्याने चांगला ऊस भाव देऊन सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे.  सभासद शेतकऱ्यांना मागील २०२३ --२४ मध्ये दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षीची एफ. आर. पी. सह  2900 प्र. मे. टन याप्रमाणे ऊस पेमेंट अदा करून सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.  त्याचप्रमाणे चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता 2800 रुपये प्र मे. टनाप्रमाणे दि. 31 डिसेंबर 2024 अखेरचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली आहे. 
         प्रसिद्धी पत्रकार नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की,  स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने नागवडे कारखान्याने सातत्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे चांगला ऊस दर व इतर पूर्तता केलेली असून सभासद व ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केलेला आहे. जिल्ह्यात इतर कारखान्यांच्या तुलनेत नागवडे कारखाना ऊस भावात कधीही मागे राहणार नाही.  म्हणूनच चालू सन 2024 -- 25 चे गळीत हंगामात गळीतास येणाऱ्या उसास प्र. मे. टन रुपये 3050 अंतिम भाव देण्याचा निर्णय संचालक मंडळांने घेतलेला आहे.  जर उद्दिष्टापेक्षा चांगले गाळप झाल्यास त्याहीपेक्षा जास्त भाव देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा राहील असे नागवडे यांनी म्हटले आहे. 
         तरी सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी  ऊस भावाबाबत कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये न ठेवता नागवडे सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळ सदस्य यांनी केले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites



केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न