महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात जिओ फेस्ट या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
By : Polticalface Team ,27-01-2025
श्रीगोंदा (प्रतिनिधी) महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात भूगोल विभागाने जिओ फेस्ट या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या दोन दिवसीय समारंभाचे उद्घाटन नवरोसजी वाडिया कॉलेजच्या प्राचार्य डॉ. उज्वला खरे यांच्या हस्ते झाले. त्या म्हणाल्या की, जिओ फेस्ट हा भूगोल विभागाचा मजेदार आणि ज्ञानवर्धक उपक्रम आहे. जगातील भौगोलिक विविधता समजून घेऊया. पृथ्वीवरील पर्वत, नद्या, महासागर आणि अन्य भौगोलिक गोष्टींमुळे आपण ज्ञानसंपन्न तर होतोच पण त्याचबरोबर आपणास आनंदही प्राप्त होतो. जी.पी.एस.चा उपयोग करून आपण आपले जगणे सुखर करू शकतो, असे त्या म्हणाल्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे होते. त्यांनीही मोलाचे विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राजक्ता ठाकूर उपस्थित होत्या.
प्रास्ताविक उपप्राचार्य,भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश साळवे यांनी केले. याप्रसंगी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी, भौगोलिक फोटोग्राफी, प्रश्नमंजुषा इत्यादी स्पर्धा व भौगोलिक उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. फोटोग्राफी स्पर्धेमध्ये भौगोलिक ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक छायाचित्रण विद्यार्थ्यांनी उत्तम पद्धतीने केले होते. बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ. संदीप कदम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन अक्षदा जगताप, स्वप्नाली शेलार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. बापू देवकर यांनी केला. आभार स्वप्नाली शेलार यांनी मानले. या समारंभात प्रा. संदीप ससाणे, प्रा. नेहा शेळके, प्रा. राहुल ठवाळ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात
वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.
शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड
शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती