श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव . रास्त दर व त्वरित पेमेंट मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज ट्रेडर्स कडे ओढा . शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नजीकच्या काळात तीन ठिकाणी उपबाजार सुरू करणार - सभापती अतुल लोखंडे
By : Polticalface Team ,29-01-2025
श्रीगोंदा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली असून सोमवारी एक नंबरच्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला 2700 रुपये दर मिळाला . येथे शनिवार व्यतिरिक्त आठवडाभर कांद्याची आवक होत असते व दिवसातून तीन वेळा कांद्याचा लिलाव होतो . श्रीगोंदा तालुक्यातील कांद्याची प्रतवारी चांगली असल्याने तामिळनाडू , आंध्र प्रदेश , ओडीसा , पश्चिम बंगाल , केरळ आदी ठिकाणाहून येथील कांद्याला मागणी असते . येथून बांगलादेश , दुबई , कोलंबो आदी ठिकाणी माल पाठवला जातो .
मध्यवर्ती असलेल्या श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेजारील कर्जत , दौंड , शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा आणतात . सोलापूर , कोल्हापूर , सांगली , पुणे येथील भावाप्रमाणे श्रीगोंदा येथे भाव मिळत असल्याने शेतकरी येथे आपला माल देणे पसंत करतात . कारण बेंगलोर , कोल्हापूर , सोलापूर , सांगली आदी ठिकाणी मालवाहतुकीसाठी येणारा खर्च वाचतो व दरही तोच मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी येथेच आपला माल देणे पसंत करीत आहेत . त्यामुळे दिवसेंदिवस आवक वाढत असल्याचे बाजार समितीचे संचालक व्यापारी लौकिक मेहता , गौरव पोखर्णा , मयूर बोरा व दिपक भंडारी यांनी सांगितले .
तालुक्यातील भानगाव , टाकळी लोणार , कोथुळ , कोसेगव्हाण , पिसोरे , तांदळी दुमाला , घोटवी , देऊळगाव , घुगलवडगाव , सुरोडी, वडाळी , चिंभळा , हंगेवाडी , बेलवंडी व परिसरातील शेतकरी नेहमीच कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून भरपूर उत्पन्न घेत आहेत . सध्या गुलाबी कांद्याची चांगली आवक असून दोन-तीन आठवड्यानंतर गावरान कांदा येण्यास सुरुवात होईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले . सोमवारी झालेल्या लिलावा मध्ये एक नंबर चांगल्या प्रतीच्या कांद्यास 2700 रुपये भाव मिळाला , तर त्याखालील दोन नंबर कांद्यास पंधराशे ते दोन हजार रुपये भाव मिळाला तर तीन नंबर कांद्यास त्यापेक्षा थोडा कमी भाव मिळाला . वाहतूक खर्च कमी लागत असल्याने शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांना मध्यवर्ती असलेल्या श्रीगोंदा येथील बाजार समितीमध्ये कांदा देणे सर्व दृष्टीने फायद्याचे वाटते . येथील व्यापाऱ्यांनी मालाचे योग्य वजन , रोख पेमेंट व चांगली सेवा देण्याची परंपरा कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती वरील विश्वास वाढत आहे .
यापुढे कांदा मार्केट वर विशेष लक्ष देऊन नजीकच्या काळात काष्टी , कोळगाव व देवदैठण येथे उपबाजार सुरू करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जवळ मार्केट उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी सांगितले . ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ , वाहतूक खर्च वाचून त्यांच्या पदरात जास्त पैसे पडतील .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी
मराठी चित्रपट लवेरिया थेट YouTube वर रिलीज; १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत श्रीगोंद्यातील दोन सख्या बहिणींनी केले यश संपादन
नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे अडले कुठे? , पाच वर्षांनंतरही वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवडी बाबत अनभिज्ञ नंदकुमार कुरुमकर
भारतीय बौध्द महासभा कोरेगाव मूळ ग्रामशाखेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी. समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड संपन्न.
बिबट्याच्या दहशतीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला जंगलात राहिल्यासारखे वाटते
लिंपणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चव्हाट्यावर! , ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरुद्ध आमरण उपोषण करणार- विजय ओहोळ
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी जेरबंद.१४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड. दोन आरोपी अटक
पाटस येथे तक्षशिला बुध्द विहारात रमाई माता जयंती उत्साहात साजरी. संघर्षमय माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधन.
भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा उरुळी कांचन. माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी.
केंद्र सरकारने केलेले नवीन चार कामगार कायदे रद्द करावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी इंटर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण यांची फेरनिवड
करमाळा पोलीस स्टेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस
न्यू इरा पब्लिक स्कूल मध्ये महिला पालक हळदी-कुंकू समारंभ संपन्न
यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सवानिमित्त. मंगला बनसोडे मा.नितिनकुमार बनसोडे (करवडीकर) व मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ (नारायणगांवकर) यांचा बहुरंगी तमाशा
श्रीगोंद्यातील वांगदरी गावचे सुपुत्र शिक्षक नेते आबासाहेब जगताप यांची राष्ट्रीय शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - शिक्षक नेते पदी बाळासाहेब झावरे
बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण
पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद
नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान