५१ हजार रूपयांच्या देणगीतून साकारतेय सभामंच व ध्वजस्तंभाचे काम - शिंदे वहिनींच्या दातृत्वाला सलाम! !
By : Polticalface Team ,29-01-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी )देणाऱ्याचे हात हजारो. ... या उक्तीप्रमाणे आपण जेवढे समाजाला देऊ त्याच्या कितीतरी पट निसर्ग आपल्याला देतो. सत्कार्यातून समाधान शोधणारी माणसे गाठीला बांधून मिरवण्यापेक्षा पाठीला बांधून धर्म जपतात. त्यातच ईश्वर शोधतात. असाच दानशूरपणा जपणाऱ्या वहिनीसाहेब म्हणजे आदरणीय श्रीम.नयनतारा पोपटराव शिंदे होत. त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तारांबळ पाहिली. व दिवंगत नेते जिजाबापू शिंदे ( सदस्य पं स श्रीगोंदा ) यांचे स्मरणार्थ शाळेस सभामंच व ध्वजस्तंभ देण्याचे सांगितले आणि प्रत्यक्षात २६ जानेवारीस कामही पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे जि प उंडेमळा / शिंदेमळा शाळेच्या सौंदर्यात निश्चित भरच पडेल. शाळेतर्फे आपले मनःपूर्वक आभार ! आपल्या दातृत्वास शतदा सलाम !
वाचक क्रमांक :