शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात मंत्री स्तरावर सकारात्मक चर्चा

By : Polticalface Team ,29-01-2025

शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात मंत्री स्तरावर सकारात्मक चर्चा लिंपणगाव ( प्रतिनिधी ) शिक्षक भारती संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अशोक बेलसरे सर व शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी समिती राज्य महिला अध्यक्ष रुपाली ताई कुरूमकर यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय नामदार चंद्रकांत पाटील, व शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांना भेट होऊन सकारात्मक चर्चा झाली. २८.०१.२०२५ रोजी शिक्षक भारती वि अ संघर्ष समिती महिला राज्यध्यक्षा रुपालीताई कुरूमकर यांनी शिक्षण मंत्री . ना. दादा भुसे यांची भेट घेतली सोबत अनेक शिक्षक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी १०वी व १२वीच्या बोर्ड परीक्षांशी संबंधित पर्यवेक्षक व केंद्र संचालक यांच्या अंतरबदलाबाबत घेतलेला निर्णय शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनुकूल नसून, या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली व उपस्थित असलेल्या आमदार महोदयांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि सूचना लक्षात घेऊन त्यामध्ये निश्चितपणे दुरुस्ती (बदल) करण्याबाबत मा. शिक्षण मंत्री दादा भूसे साहेब यांनी आश्र्वासित केले. 14 ऑक्टोबर 2024 रोजी अंशतः अनुदानित, अनुदानासपात्र शाळांना, शिक्षकांना टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले, त्याचा जीआर देखील करण्यात आला, परंतु बजेट मध्ये न आल्यामुळे किंव्हा नजर चुकीने राहिल्यामुळे ते हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये त्याची तरतूद न झाल्यामुळे राज्यातील 61 हजार शिक्षक टप्पा अनुदानापासून वंचित आहेत, त्यामुळे येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये बजेटची तरतूद करून राज्यातील 61 हजार शिक्षकांना टप्पा आणून अनुदान मिळवून देण्यात यावे अशी विनंती केली. सन 2024 25 च्या संच मान्यता देखील प्रलंबित असून त्यादेखील तात्काळ होण्याकरिता आपण सूचना द्याव्यात अशी विनंती केली, वरिष्ठ लिपिकांना वेतन संरक्षण देऊन त्यांना आहेत त्या शाळेत समायोजन करणे, माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळा सहायक हे पद महत्वाचे असून कोणत्याही प्रयोगशाला सहायकास सरप्लस न करता त्या निकषांमध्ये बदल करून शाळा तिथे प्रयोगशाळा सहाय्यक देण्याबाबत देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग रणजीत सिंह देओल साहेब, उपसचिव तुषार महाजन साहेब, उपसचिव समीर सावंत साहेब यांची देखील भेट घेऊन वरील प्रश्न आपण देखील सकारात्मकपणे मांडा आणि मंत्री महोदयाच्या निदर्शनास आणून शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताकरिता योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती केली. जुनी पेंशन योजना,टप्पा अनुदान,विनाअनुदानित ते अनुदानित बदली मान्यता,प्रस्तावित वाढीव पदे मान्यता व समायोजन, शालार्थ आय.डी., एकस्तर वेतनश्रेणी, अर्धवेळ मान्यता,सी.एच.बी.मान्यता,फरक बिल,मेडिकल बिल,शाळाबाह्य कामे,आदी प्रश्नासंदर्भातसकारात्मक चर्चा झाली असून लवकरच शिक्षक भारती सोबत बैठक आयोजित केली जाणार आहे. सदर मागण्याना पाठिंबा राज्यध्यक्ष जयवंत भाबड,राज्य सचिव सुनील गाडगे,पुणे विभागीय अध्यक्ष महेश पाडेकर,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप(माध्यमिक ),रामराव काळे (उच्च माध्यमिक), सोमनाथ बोनतले,सिकंदर शेख,रूपाली बोरुडे, बाबासाहेब तांबे, संजय तमनर, सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, संपत वाळके, गणपत धुमाळ, मफीज इनामदार, श्याम जगताप, सोलापूर जिल्हा अध्यक्ष शाहू बाबर, सुजित काटमोरे, पुणे विभागीय समन्वयक पोपटराव सांबरे, जिल्हाध्यक्ष अशोक बोबडे, विजय पांडे, प्रवीण मालुंजकर,दादासाहेब कदम, सचिन जासूद, सचिन लगड, बाबाजी लाळगे, साई थोरात, संजय पवार, संजय भुसारी, किसन सोनवणे, संतोष शेंदुरकर, कैलास जाधव, संभाजी पवार, विजय कराळे, अमोल वर्पे, आदी पदाधिकारी सदस्य यांनी पाठिंबा दिला. याप्रसंगी अनेक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक बांधव उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न