सहकार महर्षी बापूंच्या प्रेरणेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहून काम करणार- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,30-01-2025

सहकार महर्षी बापूंच्या प्रेरणेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहून काम करणार- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

     लिंपणगाव (प्रतिनिधी)  स्वर्गीय शिवाजीराव नागवडे तथा बापू यांच्या विचार प्रेरणेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटीबद्ध राहून कारखाना हितासाठीच काम करणार असल्याची ग्वाही सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली. 

          स्व. शिवाजीराव नागवडे यांनी ऐन तारुण्यात श्रीगोंदा तालुक्याच्या समाजकारणात व राजकारणात उडी घेऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नागवडे कारखान्याची उभारणी केली.  पाट पाण्याचा प्रश्न,  विजेचा प्रश्न,  दळणवळणाचा प्रश्न सोडवून शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची घातले.  त्यांनी दिलेले विचार संस्कार व प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण सदैव उराशी बाळगून सभासद शेतकऱ्यांच्या व कारखान्याच्या हितासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन नागवडे यांनी केले.  

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संचालक अंबादास दरेकर होते. यावेळी राजेंद्रदादा मित्र मंडळाच्या वतीने व विविध संस्थांच्या वतीने चेअरमन राजेंद्रदादा नागवडे व सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.  कारखान्याचे संचालक विश्वनाथ गिरमकर यांनी एकरी 125 में.टन  तर लोणी व्यंकनाथ येथील तरुण शेतकरी दीपक खोले यांनी एकरी 120 में. टन  ऊस उत्पादन काढल्यामुळे त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.  यावेळी माजी संचालक विलासराव काकडे,‌ रमेश गायकवाड,  ॲड. सुनील भोस, तुळशीराम रायकर, सुरेश लोखंडे,  दत्तोबा कातोरे,  डॉ.  दिलीप  भोस,  माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे,  नगरसेवक संतोष कोथिंबीरे,  प्रशांत गोरे,  निसार बेपारी  पोपटराव बोरुडे,  विठ्ठल वाळुंज,  सुदाम औटी, सुभाष भापकर  मेजर चांगदेव पाचपुते, मेजर शिवाजी नलावडे,  माणिकराव ढगे,  विक्रम पाचपुते,  शिवाजी ननवरे जयराम धांडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे व इतर खाते प्रमुख यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        याप्रसंगी संचालक सुभाष  शिंदे, हेमंत नलगे सर,  माऊली हिरवे,  पंडित कातोरे  गणेश गायकवाड,  सतीश मखरे सर, अभिषेक रायकर, आदी  मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.  स्वागत,  सूत्रसंचालन व प्रास्ताविक भाऊसाहेब बांदल यांनी केले तर संचालक भाऊसाहेब नेटके यांनी आभार मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न