यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने माजी सेवा निवृत्त पोलीस दिलीप निवृत्ती दोरगे यांचा जागीच मृत्यू.
By : Polticalface Team ,31-01-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ३० जानेवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने यवत गावातील जेष्ठ नागरिक व सेवा निवृत्त पोलीस. दिलीप निवृत्ती दोरगे वय ६० वर्ष हे जागीच मृत्यू झाल्याची घटना ता ३० जानेवारी २०२५ रोजी घडली आहे
या बाबत यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी राजेंद गणपत मलभारे वय 61 वर्ष रा यवत ता-दौंड जि-पुणे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की फिर्यादी यांचे मेव्हुणे दिलीप निवृत्ती दोरगे हे यवत गावातील मराठी शाळेच्या पाठीमागे त्यांचे कुंटुंबासह राहत असुन ३० जानेवारी २०२५ रोजी दुपारी 12ः45 वाचे-सुमारास फिर्यादी यांचे जोडीदार संदीप पंढरीनाथ असे आंम्ही यवत गावातील साईकृपा टी हाउमध्ये चहा पित असताना माझे मेव्हुणे दिलीप निवृत्ती दोरगे हे पायी चालत पुणे सोलापुर हायवे डांबरी रोड क्राॅस करीत असताना त्यांना पुणे बाजुकडुन सोलापुर बाजुकडे भरधाव वेगात जात असलेल्या ,एका मोटार सायकलची जोरात धडक बसुन अपघात झाला.
हा अपघात झाले नंतर मोटार सायकल वरील चालक हा अपघात ठिकाणी न थांबता सोलापुर बाजुकडे निघून गेला आहे- मी मेव्हुणे दिलीप दोरगे यांचे जवळ जावुन पाहीले असता अप?ाातात त्यांना डोक्यास, तोंडास, पायास किरकोळ व गंभीर मार लागल्याने ते बेशुध्द पडले- त्यांची काही ,कसलीही हालचाल होत नव्हती त्यांना धडक बसलेल्या मोटार सायकल वरील चालकाचा काळे रंगाचा मोबाईल अपघात ठिकाणी पडला असुन यवत पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मोबाईल खाली पडल्यामुळे त्याचे डिसप्ले फुटला आहे.
अपघात ठिकाणी अँब्युलंन्स आले नंतर आंम्ही मेव्हुणे दिलीप दोरगे यांना जखमी अवस्थेत यवत सरकारी दवाखान्यात घेऊन गेला तेथे डाॅक्टरांनी मेव्हुणे दिलीप निवृत्ती दोरगे वय 60 वर्ष रा-यवत ता-दौंड जि-पुणे यांना तपासुन पाहिले असता ते मयत झालेचे सांगितले आहे. अपघात हा मोटार सायकल वरील अज्ञात चालकाच्या चुकीमुळे झाला आहे. झालेल्या अपघाता संदर्भात मी यवत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आलो आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी
मराठी चित्रपट लवेरिया थेट YouTube वर रिलीज; १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत श्रीगोंद्यातील दोन सख्या बहिणींनी केले यश संपादन
नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे अडले कुठे? , पाच वर्षांनंतरही वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवडी बाबत अनभिज्ञ नंदकुमार कुरुमकर
भारतीय बौध्द महासभा कोरेगाव मूळ ग्रामशाखेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी. समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड संपन्न.
बिबट्याच्या दहशतीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला जंगलात राहिल्यासारखे वाटते
लिंपणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चव्हाट्यावर! , ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरुद्ध आमरण उपोषण करणार- विजय ओहोळ
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी जेरबंद.१४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड. दोन आरोपी अटक
पाटस येथे तक्षशिला बुध्द विहारात रमाई माता जयंती उत्साहात साजरी. संघर्षमय माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधन.
भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा उरुळी कांचन. माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी.
केंद्र सरकारने केलेले नवीन चार कामगार कायदे रद्द करावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी इंटर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण यांची फेरनिवड
करमाळा पोलीस स्टेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस
न्यू इरा पब्लिक स्कूल मध्ये महिला पालक हळदी-कुंकू समारंभ संपन्न
यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सवानिमित्त. मंगला बनसोडे मा.नितिनकुमार बनसोडे (करवडीकर) व मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ (नारायणगांवकर) यांचा बहुरंगी तमाशा
श्रीगोंद्यातील वांगदरी गावचे सुपुत्र शिक्षक नेते आबासाहेब जगताप यांची राष्ट्रीय शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - शिक्षक नेते पदी बाळासाहेब झावरे
बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण
पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद
नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान