By : Polticalface Team ,2025-01-31
लिंपणगाव ( प्रतिनिधी )सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझ्या देशासाठी युवक डिजिटल साक्षरतेसाठी युवक या उपक्रमांतर्गत मढेवडगाव येथे श्रम संस्कार शिबीर आयोजित केले होते. या शिबिरा अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात आले. मढेवडगाव गावात स्वच्छता मोहीम, पथनाट्य, सुशोभीकरण, वृक्षारोपण, डिजिटल साक्षरता रॅली, अंधश्रद्धा निर्मूलन, संवर्धन, आरोग्य जनजागृती इत्यादी उपक्रम राबवण्यात आले. त्यासोबतच विद्यार्थ्यांना दररोज व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिले विचारपुष्प डॉ. विकास सोमवंशी यांनी युवकांचे आरोग्य या विषयावर भाष्य केले. दुसरे विचारपुष्प प्रा. नवनाथ शिंदे यांनी आनंदी जीवनाचे रहस्य या विषयावर सादर केले. तिसरे विचार पुष्प श्री. संतोष परदेशी यांनी संस्कारातून पर्यावरण जागृती या विषयावर मांडणी केली. चौथे विचारपुष्प हे श्री. प्रशांत खामकर यांनी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर भाष्य केले. पाचवे विचार पुष्प हे श्री. सुरेंद्र गुजराथी यांनी काव्य जगतातील तरुणाई या विषयावर सादरीकरण केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा. सुभाषकाका शिंदे, मा. व्हा. चेअरमन तथा विद्यमान संचालक , सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा फॅक्टरी हे होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची सखोल माहिती सांगितली. तसेच स्वयंसेवकांच्या श्रमदानातून करण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा सादर केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली. उपस्थितांमधून श्री. नवनाथ मुंडे सर, श्री राहुल साळवे, श्री विजयशेठ मुथा संचालक, व गावचे सरपंच श्री. प्रमोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
श्री. शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. श्री सुभाष काका शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगतात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कामांचा उल्लेख करत स्वयंसेवकांना जीवनात अधिकाधिक यश मिळवताना सातत्य ठेवता आले पाहिजे असे प्रतिपादन केले.
समारोप कार्यक्रमास मा. सुभाषकाका शिंदे, सरपंच प्रमोद शिंदे, चेअरमन प्रकाश उंडे, कारखान्याचे संचालक मा. विजय मुथा, मा. विश्वनाथ गिरमकर, प्रा सुरेश रसाळ तसेच श्री.पोपटराव शिंदे, सुभाषराव वाबळे, लालासाहेब साळवे, राजकुमार उंडे, पंडित वाबळे, भगवान कुरुमकर, वसंत साळवे, भिमराव फरकांडे, रावसाहेब जाधव, अशोक शिंदे, शरद शिंदे, राहूल साळवे, संदीप उंडे, अभिजित शिंदे, जयसिंग मांडे, लालासाहेब गोरे, नवनाथ उंडे, शंकर मांडे, प्रा. धर्मनाथ काकडे, मुख्याध्यापक जावेद सय्यद सर, काकासाहेब मांडे, राजू ससाणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार पवार त्यांनी केले. तसेच प्रा. डॉ. मनोहर सूर्यवंशी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. कोमल कांबळे, प्रा.मिलिंद बेडसे, डॉ.योगेश अहिरे, डॉ.सखाराम पारखे, प्रा.सागर रोडे, प्रा.दिपाली गायकवाड, प्रा.राजेश्री भागवत, प्रा. सुरज दिवेकर, श्री.बाबा शिंदे व श्री दिलीप मोहारे यांनी प्रयत्न केले.