कासुर्डी येथील विशेष ग्रामसभा उधळून लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या १४ लोकांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,01-02-2025

कासुर्डी येथील विशेष ग्रामसभा उधळून लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या १४ लोकांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता ०१ फेब्रुवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा सरपंच सौ धनश्री टेकवडे यांच्या अध्यक्षतेखाली दि २६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ०१: वाजे सुमारास आयोजित करण्यात आली होती या वेळी कासुर्डी गावातील विरोधी गटाने विशेष ग्रामसभेच्या सुरूवातीलाच दबाव तंत्राचा वापर करून ग्रामपंचायत अधिकारीधनजंय दिनकराव देशमुख यांनी विशेष ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच दौलता आनंदा ठोंबरे, बापु आनंदा ठोंबरे व उपसरपंच दिलीप हरीभाऊ आखाडे असे आले व मला म्हणाले की तुम्ही काही तरी कारण सांगुन आजची ग्रामसभा तहकुब करा.असे म्हणाले या वेळी मी त्यांना म्हणालो की मी माझे सरकारी काम करतोय, तुंम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच यांच्याशी चर्चा करा. असे म्हणुन त्यांना मी नकार दिला असता ते मला म्हणाले की तु सभा तहकुब नाही केल्यास तुझेकडे बघुन घेतो, तु सभा संपले नंतर घरी कसा काय जातो ते आम्ही बघतो अशी धमकी दिल्याने. दि.२९ जानेवारी २०२५ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे हजर होऊन सरकार तर्फे फिर्यादी धनजंय दिनकराव देशमुख वय 53 वर्षे व्यवसाय ग्रामपंचायत अधिकारी कासुर्डी. रा.सृष्टी सोसायटी प्लॅट नं.एफ.43 डिपी रोड कोथरूड पुणे.यांच्या फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन येथे विरोधी गटातील एकुण १४ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेले 3 वर्षा पासुन कासुर्डी येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत अधिकारी धनजंय दिनकराव देशमुख हे पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांच्याकडे खानोटा ता.दौंड येथील ग्रामपंचायतचा ही कार्यभार आहे. ग्रामसभेच्या सुरुवातीलाच विरोधी गटाने भोंडवे वस्ती येथील झालेल्या काँक्रिटी रस्त्याच्या कामा संदर्भात दप्तरी कागदपत्रे घेऊन या त्या शिवाय ग्रामसभा होऊ देणार नाही म्हणत ग्रामपंचायत अधिकारी यांना घेरावा घालून कागदोपत्री पुराव्याची मागणी करण्यात आली.या बाबत अधिक माहिती अशी की ता.26/01/2025 रोजी कासुर्डी ता.दौंड गांवातील विठ्ठल मंदीरा समोर कासुर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती धनश्री विशाल टेकवडे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे नियोजन केले होते. ग्रामसभेची वेळ दुपारी 1.00 वाजता ठरली होती. ग्रामसभेत तंटामुक्ती समिती अध्यक्ष बदल करणे हा महत्वाचा विषय होता. दुपारी 12.00 वाजे. सुमारास मी तेथे असताना माझे जवळ दौलता आनंदा ठोंबरे, बापु आनंदा ठोंबरे व उपसरपंच दिलीप हरीभाऊ आखाडे असे आले व मला म्हणाले की तुम्ही काही तरी कारण सांगुन आजची ग्रामसभा तहकुब करा. असे म्हणालेने मी त्यांना म्हणालो की मी माझे सरकारी काम करतोय, तुंम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही अध्यक्ष सरपंच यांचेशी चर्चा करा असे म्हणुन त्यांना मी नकार दिला असता ते मला म्हणाले की तु सभा तहकुब नाही केल्यास तुझेकडे बघुन घेतो, तु सभा संपले नंतर घरी कसा काय जातो ते आम्ही बघतो अशी धमकी दिली.त्यानंतर दुपारी 12.30 वाचे. सुमारास दौलता ठोंबरे, बापु ठोंबरे, दिलीप आखाडे हे परत माझ्याकडे आले व मला म्हणाले की, तु आत्ताच ग्रामसभा सुरू कर असे मला अरेतुरे बोलुन माझेशी हुज्जत घालु लागले म्हणुन मी त्यांना म्हणालो की, ग्रामसभेची वेळ 1.00 वाजता ठरली आहे त्यामुळे मला लवकर सभा घेता येणार नाही असे मी म्हणालो नंतर ते म्हणाले की ज्या लोकांच्याकडे मतदान कार्ड आहे. त्यांनाच फक्त सभेत बसण्याची परवानगी दया. असे म्हणालेने मी त्यांना ग्रामसभेसाठी मतदानकार्ड ची गरज लागत नाही. असे म्हणालो वर ते पुन्हा माझेशी हुज्जत घालु लागले. ठरल्या प्रमाणे दुपारी 1.00 वाचे. सुमारास ग्रामसभा सुरू झाली. ग्रामसभेला मी तसेच सरपंच श्रीमती धनश्री विशाल टेकवडे, सदस्य दत्तात्रय बबन आखाडे, अशोक धोडींबा सोनवणे, तानाजी मल्हारी राजवडे बापु ज्ञानोबा जगताप, संतोश विलास माकर, श्रीमती सुरेखा सोपान गायकवाड, श्रीमती मनिशा संतोष आखाडे, चेअरमन महेंद्र रामचंद्र आखाडे व इतर ग्रामस्थ तसेच दौलता आनंदा ठोंबरे, बापु आनंदा ठोंबरे व उपसरपंच दिलीप हरीभाऊ आखाडे असे हजर होते. मी ग्रामसभेत महत्वाचे वाचन करीत असताना दौलता ठोंबरे हे अध्यक्ष सरपंच यांची परवानी नसताना सारखे अधुन मधुन उठायचे व माझे जवळ येवुन मला मुद्दे मांडण्यास विरोध करून मी करीत असलेल्या कामात अडथळा करून ग्रामसभा उधळुन लावण्याचा सतत प्रयत्न करू लागले. त्यावेळी मी त्यांना समजावुन सांगण्याचा प्रयत्न करीत असताना तेथे बापु ठोंबरे, दिलीप आखाडे हे दोघे आले व त्यांनी सर्वानी मिळुन ग्रामसभेत मोठमोठ्याने बोलुन ग्रामसभेत गोंधळ घातला. त्यावेळी त्यांना अध्यक्ष सरपंच हे समजावुन सांगण्याचा प्रयत्न करीत होते परंतु त्याचे लोक काही ऐकत नव्हते. ग्रामसभा चालु असताना दौलता ठोंबरे, बापु ठोंबरे, दिलीप हरीभाऊ आखाडे यांनी वेळोवेळी मला धक्काबुक्की करून उपसरपंच दिलीप आखाडे यांनी माझे हाताला घट्ट धरून माझे हातातील प्रोसोडींग रजिस्टर व इतर फाईल हिस्कावुन घेणेचा प्रयत्न करून मला अध्यक्ष सरपंच यांचेकडे जाण्यास मज्जाव करीत होते. तसेच ग्रामसभेत उपसरपंच दिलीप आखाडे यांचे गटातील लोक कमी संख्यने असल्यामुळे ठराव मंजुर करण्यासाठी त्यांचेकडे मताधिक्य कमी होते. त्यामुळे ते स्वतः गोंधळ घालुन ग्रामसभा तहकुब करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी अध्यक्ष सरपंच यांनी त्यांना योग्य ते उत्तर देवुन लोकांना शांत करून ग्रामसभा चालु ठेवली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 


 ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष बदल करणे हा विषय मंजुर झाले नंतर 1) दौलता ठोंबरे यांनी मला धरून बाजुला ओढत नेले व तेथे हजर असलेले 2) बापु आनंदा ठोंबरे, 3) सुहास धोडींबा ठोंबरे, 4) गणेश बापु ठोंबरे, 5) दिलीप हरीभाउ आखाडे, 6) आशिष गुलाब आखाडे, 7) मयुर सुरेष आखाडे, 8) समीर दिलीप आखाडे, 9) हनुमंत बबन आखाडे, 10) विठठल धोडींबा ठोंबरे, 11) किशोर नामदेव ठोंबरे, 12) भाऊसाहेब यशवंत कोडीतकर, 13) प्रदीप संपत वीर, 14) संकेत सुरेश आखाडे सर्व रा.कासुर्डी ता. दौंड जि.पुणे असे यांनी मला घेराव घालुन मला ग्रामसभेचे प्रोसीडींग रजिस्टर लिहु नको असे म्हणुन माझे हातातील प्रोसीडींग रजिस्टर ओढून घेवु लागले व मी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून मला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली 


 सदर ग्रामसभेच्या अनुषंगाने तेथे बंदोबस्ताकामी हजर असलेल्या पोलीसांनी सहकार्यांची भुमिका घेऊन सोड्वासोडवी केली असल्याने मी तेथुन निघुन गेलो. या संदर्भात मी माझे वरीष्ठांशी चर्चा करून आज रोजी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद देणेस आलो आहे. असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. सदर ठिकाणी घडलेल्या प्रकरणी केलेल्या व्हिडीओ रेकॉर्डीग या सोबत देत आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार सहा फौज गाडेकर.अंमलदार पोलीस सहायक विजय काल्हे पुढील तपास करीत आहेत.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी

मराठी चित्रपट लवेरिया थेट YouTube वर रिलीज; १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत श्रीगोंद्यातील दोन सख्या बहिणींनी केले यश संपादन

नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे अडले कुठे? , पाच वर्षांनंतरही वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवडी बाबत अनभिज्ञ नंदकुमार कुरुमकर

भारतीय बौध्द महासभा कोरेगाव मूळ ग्रामशाखेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी. समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड संपन्न.

बिबट्याच्या दहशतीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला जंगलात राहिल्यासारखे वाटते

लिंपणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चव्हाट्यावर! , ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरुद्ध आमरण उपोषण करणार- विजय ओहोळ

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी जेरबंद.१४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड. दोन आरोपी अटक

पाटस येथे तक्षशिला बुध्द विहारात रमाई माता जयंती उत्साहात साजरी. संघर्षमय माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधन.

भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा उरुळी कांचन. माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी.

केंद्र सरकारने केलेले नवीन चार कामगार कायदे रद्द करावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी इंटर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण यांची फेरनिवड

करमाळा पोलीस स्टेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस

न्यू इरा पब्लिक स्कूल मध्ये महिला पालक हळदी-कुंकू समारंभ संपन्न

यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सवानिमित्त. मंगला बनसोडे मा.नितिनकुमार बनसोडे (करवडीकर) व मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ (नारायणगांवकर) यांचा बहुरंगी तमाशा

श्रीगोंद्यातील वांगदरी गावचे सुपुत्र शिक्षक नेते आबासाहेब जगताप यांची राष्ट्रीय शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - शिक्षक नेते पदी बाळासाहेब झावरे

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद

नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान