कासुर्डी ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी व क्लार्क संगणक दोन्ही रूमच्या कुलपांना सिल केल्या प्रकरणी चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,01-02-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०१ फेब्रुवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी ता दौंड जिल्हा पुणे येथील कार्यालयातील अधिकारी व क्लार्क संगणक या दोन्ही रुमला बेकायदेशीर कागद चिकटवून सिल केल्या प्रकरणी. सरकारतर्फे फिर्यादी धनंजय दिनकरराव देशमुख वय 53 वर्षे व्यवसाय नोकरी शिक्षण एम एस सी रा. सृष्टी सोसायटी फलेंट नं. एफ 43 डी पी रोड कोंथरूड पुणे यांच्या फिर्यादी वरून दि ३० जानेवारी २०२५ रोजी संबंधितांन विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की (प्रथम खबर हकीकत ):
फिर्यादी जबाब ता. 30/01/2025 रोजी कासुर्डी ग्रामपंचायत अधिकारी धनंजय दिनकरराव देशमुख वय 53 वर्षे व्यवसाय - नोकरी शिक्षण एम एस सी रा. सृष्टी सोसायटी फलेंट नं.एफ 43 डी पी रोड कोंथरूड पुणे 32
समक्ष यवत पोलीस स्टेशन येथे हजर राहुन फिर्याद देतो की,मी वरील ठिकाणी माझी पत्नी सौ.वंदना धनंजय देशमुख, दोन मुली असे एकत्रित राहण्यास असुन मी गेली 3 वर्षा पासुन कासुर्डी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून नोकरी करून त्यावर उपजिवीका करतो. दिनांक 28/01/2025 रोजी सायंकाळी 06.30 वाजे सुमारास मी पंचायत समिती दौंड कार्यालय येथे सभेमध्ये असताना कासुर्डी ग्रामपंचायतीचे शिपाई श्री.भानुदास गोरगल यांचा मोबाईल वर मला फोन आला तेव्हा त्यांनी मला सांगितले की, उपसंरपच श्री.दिलीप हरीभाऊ आखाडे यांनी फोन करून ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यासाठी मला दम देवून बोलावुन घेतले आहे. त्यावेळी उपसंरपंच यांच्या सोबत आणखीन तीन जण 1) दौलत आनंदा ठोंबरे 2) प्रदिप संपत वीर ३) हनुमंत बबन आखाडे सर्व रा.कासुर्डी ता. दौंड जि.पुणे हे ग्रामपंचायत कार्यालया समोर आले त्यांनी मला कार्यालयाचे कुलूप उघडायला लावले मी कार्यालयाचे कुलूप उघडले त्या नंतर त्या सर्वांनी कार्यालयात प्रवेश केला. व ग्रामपंचायत अधिकारी यांची कॅबीन रूमचे कुलूप उघडण्यास सांगितले परंतु मी त्यांना म्हणालो की, सदर रूमची चावी माइ-याकडे नाही. त्या नंतर त्यांनी क्लार्क व संगणक चालक यांचे रूमचे कुलूप उघडण्यास सांगितले परंतु मी त्यांना सांगितले की, सदर रूमची चावी माइ-याकडे नाही. त्या नंतर उपसंरपच दिलीप आखाडे यांनी कोरा कागद मागितला त्या कागदावर त्यांनी व इतर एक जणाने सहया केल्या व त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी व क्लार्क व संगणक चालक या दोन्ही रूमच्या कुलपांना कागद चिटकावुन सदर दोन्ही रूम बेकायदेशीर सिल केल्या आहेत. व मला तसेच क्लार्क व संगणक चालक यांनी आताचे क्षणापासुन ग्रामपंचायत कार्यालयात येवू नये. व या रूम उघडू नयेत असा दम दिला आहे. असे सांगितले. तसेच आमच्या कासुर्डी ग्रामपंचायत कार्यालयातील सी सी टी व्ही कॅमेरे सतत चालू आहेत. मी माझे वरिष्ठ अधिकारी याची भेट घेवून घडलेला प्रकार त्यांचे कानावर घातला असून माझे वरिष्ठ अधिकारी यांनी रितसिर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सांगितले. असल्याचे नमूद करण्यात आले आहे
दिनाक 29/01/2025 रोजी ग्रामपंचायत खानवटे येथील मासिक सभा असल्यामुळे संपुर्ण दिवसभर मी तेथे कार्यारत होतो. म्हणून दिनांक 30/01/2025 रोजी सकाळी 10.00 वा. चे सुमारास कासुर्डी ग्रामपंचायतमध्ये जावुन पाहिणी केली असताना मला माझी कॅबिन व क्लार्क व संगणक चालक यांचे ऑफिसचे दरवाजा बंद असुन त्यास कागदी सिल लावलेले दिसत आहे. म्हणून माझी खात्री झाली की, इसम नामे 1) श्री. दिलीप हरीभाऊ आखाडे 2) श्री. दौलत आनंदा ठोंबरे 3) प्रदिप संपत वीर 4) हनुमंत बबन आखाडे सर्व रा.कासुर्डी ता.दौंड जि.पुणे यांनीचं आमचे ग्रापंचायत आँफिसला मी व कर्मचारी यांनी ग्रामपंचायतीचे काम करण्यास आतमध्ये जावु नये म्हणून दरवाजास कागदी सिल लावुन बंद केले असून मला ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करण्यापासुन रोखले आहे. म्हणून माझी त्यांचे विरूध्द तक्रार आहे. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार- पो हवा चोरमले. तपासी अंमलदार-पो हवा करचे पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :