दौंड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी दौंड पोलीसांच्या जाळ्यात. कर्नाटक राज्यातुन आरोपी केला अटक.

By : Polticalface Team ,01-02-2025

दौंड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी दौंड पोलीसांच्या जाळ्यात. कर्नाटक राज्यातुन आरोपी केला अटक. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०२ फेब्रुवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे पेडगाव येथे घडलेल्या खुन प्रकरणातील व दोन वर्षांपासून फरार असलेल्या ३०२ गुन्ह्यातील आरोपी अखेर दौंड पोलिसांच्या जाळ्यात. या बाबत अधिक माहिती अशी की दि.०४/०३/२०२३ रोजी १७:०० वा.ते दि. ०६/०३/२०२३ रोजी १७:३० वा.चे सुमारास मौजे पेडगाव ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत रामभाऊ सोनबा गोधडे यांचे मालकीचे जमीन गट नंबर २७३ मध्ये राहत असलेले दिलीप शंभु सांगळे यांचेकडे कोळसा काम करणारे लेबर १) हरिशचंद्र उर्फ हरिभाऊ नवश्या वाघमारे रा.कारले, गंगेचीवाडी ता.पेन जि.रायगड २) लिला उर्फ रूपाली गणेश वाघमारे रा.भुनेश्वर ता.रोहा जि.रायगड यांनी त्यांचे सोबत काम करणारा लेबर नामे चंदर गणपत जाधव वय ६० वर्षे रा.वांद्रे ता.मुळशी जि.पुणे याचा कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी कोणत्या तरी हत्यारांने त्याचे उजव्या डोळया जवळ गळ्यावर व डावे हाताचे खांदयावर गंभीर मारहाण करुन खून करून त्याचे प्रेत ऊसाचे पाचटा खाली लपवून ठेवुन पळून गेले होते.त्या बाबत त्यांचे विरुध्द दिलीप शंभु सांगळे यांनी दौंड पोलीस स्टेशन गु.र. नंबर १७७/२०२३ भा.द.वि.क ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरचे आरोपी मार्च २०२३ मध्ये गुन्हा केले पासुन फरार होते. गुन्हया मधील मुख्य आरोपी हरिशचंद्र उर्फ हरिभाऊ नवश्या वाघमारे रा.कारले, गंगेचीवाडी ता.पेन जि. रायगड याचा बदामी कनार्टक राज्यात शोध घेवुन त्यास दिनांक २४/०१/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती तसेच यातील फरारी महिला आरोपी नामे रूपाली उर्फ लिला गणेश वाघमारे वय ३५ वर्षे रा.भुनेश्वर ता. रोहा जि.रायगड ही अनंतपुर, राज्य आंध्रप्रदेश येथुन रेल्वेने दौंड मार्गे रायगड येथे जात असल्याची माहीती मिळाल्याने लागलीच दौंड पोलीस पोलीस स्टेशन कडील पोलीस स्टाफ पाठवुन सदर महीला आरोपीस मुंबई बेंगलोर उदयान एक्सप्रेस मधुन ताब्यात घेवुन तिस सदर गुन्हयात अटक केली आहे. सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिरादार सोा, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस दौंड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पो.हवा. किरण पांढरे, पो. हवा विनोद चव्हाण, पो. हवा किरण ढुके, पो.कॉ संजय कोठावळे, पो.कॉ योगेश पाटील पो.कॉ चितारे म.पो.कॉ मोकळे यांनी मिळून केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट