By : Polticalface Team ,02-02-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी )--सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन- २०24- 25 या गाळप हंगामात ऊसाला ३०५० प्रति मे. टन ऊस भाव जाहीर केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली ग्रामस्थांकडून सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. एरंडोलीच्या सरपंच सौ मनोरमा इथापे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक सावता शेठ हिरवे; माजी संचालक विलासराव काकडे; माजी सरपंच बाळासाहेब जगताप; संजय इथापे; नरसिंग जगताप; तुकाराम भंडारे सर; संतोष इथापे; मोहन इथापे; मा चेअरमन बाळासाहेब सोनवणे; संस्थेचे संचालक शरद इथापे; प्रा डॉ विकास इथापे सर; शिवाजी इथापे सर; संभाजी इथापे सर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा डॉ विकास इथापे सर यावेळी म्हणाले की; सहकार आणि नागवडे कुटुंब हे नाते गेल्या अनेक दशकापासून श्रीगोंदा तालुक्यात घट्ट आहे. सभासद उत्पादकांनी देखील नागवडे कुटुंबावर कारखाना स्थापनेपासून विश्वास व्यक्त केला आहे. नागवडे यांनी देखील वेळोवेळी सभासद हित डोळ्यासमोर ठेवून ऊस भाव देण्याचा प्रयत्न केला. सहकारातून समृद्धी हा मूलमंत्र सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी तालुक्यात राबवल्यामुळे या दुष्काळी तालुक्याला मोठे गतवैभव प्राप्त झाले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. असे सांगून प्रा इथापे पुढे म्हणाले की; कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे हे साखर कारखान्याचा काटकसरीने कारभार पाहून शेतकरी व ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेत आहेत ही अभिमानाची बाब आहे सहकार महर्षी बापूंचा तोच वारसा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संचालक मंडळ निर्णय घेता आहेत. चालू ऊस गाळपास नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी चालू ऊस गाळपास ३०५० उच्चाअंकी ऊस भाव जाहीर केल्याने निश्चितच ऊस उत्पादक व सभासदांना मोठा दिलासा मिळाल्याचे प्रा इथापे यांनी यावेळी सांगितले.
सूत्रसंचालन तुकाराम भंडारे सर यांनी केले. आभार संभाजी इथापे सर यांनी मानले.
वाचक क्रमांक :