By : Polticalface Team ,02-02-2025
श्रीगोंदा (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने फूड फेस्टिवल, पुष्परचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मिस मॅच डे साजरा करण्यात आला. या उपक्रमांना उदंड असा प्रतिसाद लाभला. या समारंभाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीर पटवा यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, महाविद्यालयीन युवक युवतींनी उद्याच्या उद्योग व्यवसायाच्या वाटा अशा उपक्रमातून शोधाव्यात आणि आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव जरे होते. विद्यार्थ्यांच्या कलात्मक व व्यावसायिक उर्मिंना जागृत करण्यासाठी असे उपक्रम उपयोगी ठरतात. त्याचा आनंद घ्या. असे ते म्हणाले.
याप्रसंगी फूड फेस्टिवलचे समन्वयक, वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. रावसाहेब काळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पुष्परचना सजावटीचे समन्वयक म्हणून डॉ. हरिभाऊ वाघिरे यांनी काम पाहिले. फनी गेम्सचे समन्वयक म्हणून शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ यांनी काम पाहिले. या समारंभाला उदंड प्रतिसाद लाभला उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य शहाजी मखरे, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे,डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, कार्याध्यक्ष डॉ. बापू देवकर, प्रा. सौ. सुनिता सोनावळे, श्री रघुनाथ लबडे , सांस्कृतिक विभागाचे डॉ. राजाराम कानडे, प्रा. रमेश थोरात,एन.सी.सी. विभागाचे प्रमुख डॉ. किरण ढवळे, एन.एस.एस.चे प्रमुख प्रा. भाऊसाहेब बुलाखे, प्रा. देवेंद्र बहिरम, डॉ. राहुल गायकवाड, अधीक्षक बाळासाहेब राऊत तसेच या समारंभाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. राम ढगे यांनी केले.
वाचक क्रमांक :