श्रीगोंद्यातील वांगदरी गावचे सुपुत्र शिक्षक नेते आबासाहेब जगताप यांची राष्ट्रीय शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - शिक्षक नेते पदी बाळासाहेब झावरे

By : Polticalface Team ,05-02-2025

श्रीगोंद्यातील वांगदरी गावचे सुपुत्र शिक्षक नेते आबासाहेब जगताप यांची राष्ट्रीय शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड -    शिक्षक नेते पदी बाळासाहेब झावरे

     लिंपणगाव ( प्रतिनिधी) *सह्याद्रीची उंची लाभलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाची वाटचालही तितकीच खडतर आणि प्रेरणादायी आहे मित्रांनो....* अशीच परंपरा लाभलेला आमचा अहमदनगर जिल्हा आणि आत्ताचा अहिल्यागर.. या जिल्ह्यानं अनेक हि-यांना त्याच्या कुशीत वाढवलं... *कै. भा. दा. पाटलांची झुंजार कारकीर्द लाभलेला शिक्षक राजकारणात अह. प्राथ शिक्षक बँकेतील राजकारण ढवळून निघालेला आमचा जिल्हा..* या जिल्ह्यातील अनेक सुपुत्रांपैकी आमचे आबासाहेब.. श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी या छोट्याशा गावातून आलेलं हे एक धाडसी नेतृत्व अहमदनगर जिल्ह्याच्या शिक्षक राजकारणात तालुक्याच्या. *कार्यालयीन चिटणीस पदापासुन १९९४ साली सुरुवात झाली... या पदावर काम करताना तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवताना जिल्ह्यातील नेत्यांशी जोडले गेले बैठकांमध्ये आपल्या वक्तृत्वाची छाप पाडत पुढे पुढे जात राहिले.. भा. द. पाटील, खांदवे दादा, ठुबे गुरुजी, रावसाहेब सुंबे,रावसाहेब रोहकले, डॉ. संजयजी कळमकर, रा. या. औटी, संजयजी शेळके, कल्याणजी लवांडे, राजेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन, सल्ला, घेत घेत जिल्हा कार्यकारीणीत मानाचं स्थान मिळवलं अहमदनगर जिल्ह्याची जिला कामधेनू म्हणतात त्या शिक्षक बँकेचे संचालक पद १९९९ साली लाभलं आणि आपल्या कामाला वाहून घेत असताना आमचे आबासाहेब पहाता पहाता बँकेचे २००३ साली चेअरमन झाले... मग काय... आता कामाचा आवाका वाढला होता आद. शिवाजीराव पाटलांसारख्या राज्य नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी घेत जिल्ह्याची धुरा सांभाळण्याची सुवर्णसंधी मिळाली म्हणजे आबासाहेब आता २००९/१० साली शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बनले.... पुढे अंगात वारं भरल्यागत कामाला लागले आता संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आबांवर होती ईथला शिक्षक आबासाहेबांसारख्या धाडसी नेतृत्वाकडं बघून स्वत: ला सुरक्षीत समजत होता... अनेकांचे प्रश्न आबासाहेबांनी रात्रीचा दिवस करुन अधिका-यांशी प्रसंगी कठोर भुमिका मांडत सोडवले...काम करणा-याला दिशा लोटांगण घालतात त्याप्रमाणे आबासाहेबांना सा-या शिक्षकांच्या अडचणी लोटांगण घालत होत्या.. राज्य नेतृत्व आद. संभाजीरावांनी आबांच्या अंगी असलेले नेतृत्व गुण हेरले आणि पुढे *२०१५/ १६ मध्ये त्यांना नाशिक विभागीय अध्यक्ष म्हणून संधी दिली* आता मात्र आबांना वेळ कमी पडू लागला कारण आता राज्यभरातील शिक्षक संघाच्या नेत्यांशी भेटी वाढत होत्या.. आणि शिक्षकांचे पंचप्राण आद. संभाजीराव थोरात तात्यांशी कामाच्या प्रभावामुळं जवळीक वाढत होती आपली कामाची शैली आणि संघाला वाहून घेण्याची वृती यामुळे *मंगळवेढा सोलापूरच्या २०१८ /१९ च्या राज्य महामंडळ सभेत आबासाहेबांना राज्य सरचिटणीस पद बहाल करण्यात आलं...* कै. वाशी आद. आंबादास आण्णांना त्यावेळी राज्याच्या अध्यक्षपदाची तात्यांनी जबाबदारी दिली.. आता आबा आणि आंबादास आण्णा ही दोन हंसाची जोडी चळवळीमध्ये श्रेष्ठ ठरत गेली परंतू अचानक भुकंप व्हावा तशी घटणा घडली आणि आंबादाअण्णा अचानक आपली साथ सोडून देवाघरी अनंत काळात विलीन झाले.. आता राज्यावर बिकट प्रसंग ओढावला होता अशातच संघाचे महासचिव आद. बाळासाहेब झावरे आबांना धीर देत पुढे आले सर्व प्रश्न आता बाळासाहेब व आबासाहेब मोठ्या निकरानं लढत लढत सोडवीत राहिले.. त्यांना आमच्या जिल्ह्याचे चाणक्य ज्याला म्हणतात असे आद. रावसाहेब पा. सुंबे आपले चाणाक्ष सल्ले देत होते... त्यातच जिल्ह्यात आचानक फुट पडली संघाचे दोन भाग झाले संघ जिल्ह्यात मोडकळीस आला पण तरीही हार न मानता आद. आबासाहेब, बाळासाहेब झावरे, रावसाहेब सुंबे, बाळासाहेब सालके,किसनराव बोरुडे, श्रीम. संगिताताई कुरकुटे,  रघूनाथ झावरे, बाळासाहेब देंडगे,  विशाल खरमाळे, मी (अमोल साळवे) या निवडक शिलेदारांना सोबत घेत जिल्हासंघाची पुनर्बांधणी केली संपूर्ण जिल्हा या सर्व धुरीणांनी संघमय केला ... आता या जिल्ह्याला या पूर्वी कधीही न मिळालेली संधी या कालच्या गोंदवले, सातारा या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या राज्य महामंडळसभेत राष्ट्रीय अध्यक्ष पदाची संधी मिळाली खरोखर आज आमच्या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा लागला आमच्या आबासाहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची संधी मिळाली... कोणतीही संधी आपोआप कधीच मिळत नसते तर तिच्यामागं असते त्याग व बलिदानाची परंपरा जी आमच्या जिल्ह्याला वंशपरंपरेनं मिळालेली आहे... जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघाचे शिलेदार आबासाहेब आपल्या सोबतच आहेत यात तिळमात्रही शंका नाही आपल्या पुढील कार्यास दससहस्र शुभकामना व्यक्त करतो... 

*"संघ शक्ति युगे युगे"*

*थांबला तो संपला 

*शब्दांकन - अमोल साळवे, जिल्हासरचिटणीस, महा. राज्य प्राथ. शिक्षक संघ, अहिल्यानगर*


  * संकलन: नंदकुमार कुरुमकर पत्रकार


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न