न्यू इरा पब्लिक स्कूल मध्ये महिला पालक हळदी-कुंकू समारंभ संपन्न
By : Polticalface Team ,06-02-2025
करमाळा प्रतिनिधी
मंगळवार दिनांक 04/02/25 रोजी न्यू इरा पब्लिक स्कूल जेऊर येथे "महिला पालक हळदी- कुंकू "
समारंभाचे आयोजन करण्यातआले होते.या वेळी जेऊर येथील डॉ. सौ. शारदा सुभाष सुराणा यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महिलांनी आपल्या सुप्त गुणांचे प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न केला. काहींनी , उखाणे, गाणे, भारुडे यांचे सादरीकरण केले.त्या नंतर सौ.शारदा सुराणा मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
खास महिलांसाठी असा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल न्यू इरा पब्लिक स्कूल चे सर्वांनी आभार मानले.
कार्यक्रम अधिक रंगतदार झाला तो महिलांसाठी आयोजित केलेल्या " *घे भरारी....* " : *खेळ रंगला पैठणीचा* " यामध्ये संगीत खुर्ची, जोडी जोडीची उठाबशी , फुगा फुगवून त्यावर बसून फोडणे अशा खेळांचा समावेश होता. यामध्ये सर्वच महिलांनी अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रत्येक महीला आपणच ही स्पर्धा जिंकणार या जोशात सहभागी झाल्या होत्या.
शेवटी अटीतटीच्या या स्पर्धेत बाजी मारलेल्या महिला पुढीलप्रमाणे :-* *प्रथम क्रमांक*
1)सौ.पूजा बाळू मत्रे (जेऊर) *पैठणी विजेती*
*द्वितीय क्रमांक*
2) सौ.तेजा सर्जेराव कर्चे (जेऊर) *Gift Hamper विजेती*
*तृतीय क्रमांक*
3)सौ.पूजा औदुंबर रोकडे (वांगी नं.3) *Gift Hamper विजेती*
या विजेत्या महिलांना शाळेच्या सर्व महिला शिक्षकांच्या हस्ते बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आले.विजेत्या महिलांचे सर्वांनी अभिनंदन केले.
सर्व महिला पालकांना वान देण्यात आले.
सौ. अवसरे मॅडम व सौ चव्हाण मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर घाडगे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला शिक्षक व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक :