राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण यांची फेरनिवड

By : Polticalface Team ,06-02-2025

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण यांची फेरनिवड करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना श्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे, हि कार्यकारणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी जाहीर केली असून देशभरातून अनेक राज्यांचे युवक प्रदेशाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी निवडले गेले आहेत. महाराष्ट्र राज्यातून युवक नेते आणि लातूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले सुरज चव्हाण यांना पुन्हा एकदा पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणी नंतर सुरज चव्हाण हे अजित दादांच्या राष्ट्रवादी सोबत एकनिष्ठ राहिले होते आणि पक्षाने त्यांना मागच्या वर्षी पहिल्यांदा प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली. सुरज चव्हाण यांनी त्या संधीच सोन करत महाराष्ट्रभर युवकांची फोज उभा केली, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन युवक संघटना त्यांनी वाढवली. संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात युवक रोजगार मेळावे घेऊन तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांनी पक्षाशी जोडला, त्याचप्रमाणे सभासद नोंदणी, युवक मेळावे, वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबिरे, संघटना वाढीसाठी त्यांनी महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम पदाधिकाऱ्यांना देऊन संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि संघटना वाढवली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला आलेले यश हे प्रामुख्याने युवक संघटनेने केलेल्या धडाकेबाज कामामुळेच आले असे पक्षातील अनेक जेष्ठ नेत्यांनी आपल्या भाषणात उघडपणे सांगितले त्यामुळे सुरज चव्हाण यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळेच हे शक्य झाल्याचे दिसून आले. या सर्व गीष्टींची पक्षाने दखल घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ सुरज चव्हाण यांच्या गळ्यात घालून त्यांना न्याय दिला आहे. त्यांच्या निवडणीचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत असून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत मुंबई येथे त्यांची भेट घेऊन सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव श्री परबजितसिंग स्वहानी, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्री अक्षय शिंदे, सांगलीचे युवक जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील, अकोल्याचे युवक कार्याध्यक्ष श्री अजिंक्य राऊत, अकोल्याचे युवा नेते श्री अजय मते यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट