By : Polticalface Team ,09-02-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत तालुका शाखा पूर्व यांच्या विद्यमाने ग्रामशाखा कोरेगाव मूळ यांच्या मार्फत आज रमाई जयंती तसेच तालुका हवेली मार्फत समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड घेण्यात आल्याने उपस्थित बांधवांचे लक्ष वेधले होते माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक धम्म वंदना घेतली तसेच समता सैनिक दलाच्या सैनिकांनी सलामी दिली या परेडला पुणे जिल्हा पूर्व चे अध्यक्ष अरुण सोनवणे, सरचिटणीस व मेजर राजरतन थोरात प्रचार उपाध्यक्ष वामन वाघमारे गुरुजी व सि डी ऑफिसर आगळे मॅडम उपस्थित होत्या, तसेच पूर्व हवेलीचे सरचिटणीस विजय जी गायकवाड कोषाध्यक्ष रवींद्र कदम संस्कार उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे गुरुजी महिला उपाध्यक्षा नीलिमाताई कांबळे मेजर बाळासाहेब पाटोळे नागसेन ओव्हाळ हे देखील प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक कठीण प्रसंगाचे धडे उलगडून उपस्थित महिलांना आदर्श स्वाभिमान बाळगणाऱ्या माता रमाई आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनातील संकटांना हरवून सुख दुःखाला सामोरे जाऊन जबाबदारी सांभाळली. चार पोटचे गोळे त्याच्या पासून दुरावली. हि अतिशय धोकादायक परिस्थिती होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई यांना एकूण पाच अपत्ये झाली होती. यशवंत, गंगाधर, राजरत्न, रमेश व इंदू (मुलगी). यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. तेव्हाची परिस्थिती उमागली तर सहनशीलता म्हणजे माता रमाई आंबेडकर असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही माता रमाई च्या त्यागाची गोड फळे आजचा बौध्द व बहुजन समाज चाखत आहे.. मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच सांगितले आहे. ( शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ) आम्ही काय शिकलो ? आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. परिस्थिती बदलली आहे. आरक्षणाचा फायदा घेऊन शिक्षण घेतले. नोकरी मिळाली. बंगला बांधला. बायको मिळाली फिरायला गाडी आणि राह्यला माडी झाली. खातोय तो घास आणि घेतोय तो श्वास फक्त बाबासाहेबांच्या मुळं सर्वकाही मिळत आहे. कवी वामन दादांनी सुंदर गीत लिहिले आहे. भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते. तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते ।। धृ ।। वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.. तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते.
माता रमाई आंबेडकर जयंती कोरेगाव मूळ ग्रामशाखेचे अध्यक्ष के डी पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. सोबत कोरेगाव मूळ ग्रामशाखे चे जितेंद्र पवार वैभव पवार सोमनाथ साळवे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्व हवेलीचे संघटक नवनिर्वाचित बौद्धाचार्य आयु.विशाल जी गायकवाड यांनी केले या प्रसंगी कोरेगाव मूळ ग्रामशाखे चे पदाधिकारी उपासक युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :