By : Polticalface Team ,14-02-2025
दौंड( प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर 95450 49548): दौंड तालुक्यातील बिरोबावाडी गावची तहकूब ग्रामसभा ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती, यावेळी सरपंच बापूसाहेब सोनवणे व ग्रामपंचायत अधिकारी सुरेखा सोनवणे तसेच सदस्य माया विश्वास गावडे, महेश मोहन खारतुडे, आदीसह अनोळखी 25 व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते, जन सुविधा व 25 /15 निधी असा एकूण 40 लाख रुपये उपलब्ध असून तो निधी सर्व सदस्यांच्या अनुमतीने समान पद्धतीने गावांमध्ये वाटप करण्याचे ठरले, परंतु कोकरे वस्ती या ठिकाणी जास्तीचा निधी द्या म्हणून रंजीत बळवंत गावडे, प्रमोद बाळासो गावडे, जयदीप रंजीत गावडे, सुरज दत्तू वायाळ व इतर व्यक्तींनी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना कसा जास्तीचा निधी येत नाही असे म्हणून शिवीगाळ करत अंगावर धावले व शासकीय दप्तर बळजबरीने ताब्यात घेऊन गैरवापर करण्याचा प्रयत्न केला, यामुळे सर्व अंगावर आल्याने सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी भयभीत बेबी झाले, अशा प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी यासाठी सरपंच बापूसाहेब सोनवणे व ग्रामपंचायत अधिकारी सुरेखा सोनवणे यांनी यवत पोलीस स्टेशनला 11 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रार दाखल केली आहे, याबाबत दौंड ग्राम ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संदीप ठवाळ म्हणाले की, सध्या महाराष्ट्र मध्ये सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी यांना काम करणे सोपे राहिलेले नाही, जीव मुठीत धरून कामकाज करावी लागत आहे, यामुळे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचा पुन्हा संतोष देशमुख होऊ नये यासाठी अशा प्रवृत्तीच्या विरोधात खडक कारवाई करावी यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील यांच्याकडे करणार आहोत, सर्व संघटना अशा प्रवृत्तीच्या विरोधात सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करून अशा प्रवृत्तींना योग्य वेळी ठेचले पाहिजे, अन्यथा ग्रामपंचायत अधिकारी लोकशाहीच्या सनदशील मार्गाने आंदोलन करतील
वाचक क्रमांक :