महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयात 395 वी शिवजयंती उत्साहात साजरी
By : Polticalface Team ,20-02-2025
श्रीगोंदा प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालामध्ये आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली निमित्ताने जय शिवाजी जय भारत अंतर्गत पदयात्रेचं आयोजन करण्यात आले. श्रीगोंदा शहरात “महाविद्यालयापासून ते महात्मा फुले चौक “ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय असा नारा देत भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली होती, यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. बीसीएसच्या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांची आरती व पोवाड्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमावेळी प्रा. डॉ. बापू देवकर यांची चिमुकली कन्या पूर्वा देवकर हिने अफजल खानावर मधुर अश्या आवाजात प्रेरणादाई पोवाडा देखील गायला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे सर विज्ञान विभाग प्रमुख डॉ. नितीन थोरात जूनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा शहाजी मखरे सर पर्यवेक्षक रत्नाकर झिटे सर राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक एनसीसी विभागाचे सर्व छात्र व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. शिवजयंती पदयात्रा व कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा. बुलाखे भाऊ प्रा. देवेंद्र बहिरम राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख डॉ किरण ढवळे विद्यार्थी कल्याण मंडळ विभाग प्रमुख डॉ. वाघिरे हरिभाऊ यांनी मोलाचे सहकार्य केले . तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनियर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राम ढगे यांनी केले.
वाचक क्रमांक :