दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव येथील लक्ष्मी इन्टर प्रायजेस या कंपनीतील आगीमध्ये सुमारे ३५ लाख रूपयांचा माल जळून खाक.
By : Polticalface Team ,02-03-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०१ मार्च २०२५ रोजी दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील लक्ष्मी इन्टर प्रायजेस या कंपनी मध्ये
अचानक शॉट सर्किट होऊन स्कॅप मालाला आग लागली. या आगीमध्ये सुमारे ३५ लाख रूपयांचा माल जळून खाक झाला असल्याची खबर देणार नाव गणेश उमेश पारगे वय २७ वर्षे, व्यवसाय प्लास्टीक मोल्डींग रा.भांडगाव ता. दौड जि.पुणे यांनी यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे अकस्मात जळीत गु.रजि.नं. व कलम अ.जळीत रजि.नं.०८/२०२५ नुसार दाखल करण्यात आली आहे
हि घटना ता.०१/०३/२०२५ रोजी सकाळी ०९/३० वाचे सुमारास मौजे भांडगाव ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी अकस्मात जळीत घटना घडली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की वर नमुद ता. वेळी व ठिकाणी यातील खबर देणार यांचे कंपनीचे गोडावुनचे बाहेर असलेले मिटर मध्ये अचानक शॉट सर्किट स्कॅप मालाला आग लागली. त्या आगीमध्ये कंपनीचे प्लास्टीक मोल्डींग नर्सरी झाडांचे ट्रे बनविण्यासाठी लागणारा तयार माल कच्चा माल तसेच दे बनविण्यासाठी लागणारी एक मशीन एक कॉम्प्रसर पाच ट्रे बनविण्यासाठी लागणारे डाय एक पाणी थंड करण्यासाठी लागणारे चिलर मशीन असे साहीत्य जळून खाक होवून सुमारे ३५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदरची आग ही कंपनीचे लाईटचे मिटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली असल्याचे नमूद करण्यात आले असुन सदर आगी बाबत खबर देणार यांची कोणावर काही एक संशय नसून तक्रार नाही. वगैरे मजकूरा वरून दाखल यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पो. हवा.शिंदे तपासी अंमलदार सहा.फौजदार जाधव पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :