जबरी चोरीच्या उद्देशानेच आरोपी गेले होते. इतर कोणताही उद्देश नव्हता चोरांची कबुली. मा.पोलीस अधिक्षक पंकज देशमुख

By : Polticalface Team ,07-03-2025

जबरी चोरीच्या उद्देशानेच आरोपी गेले होते. इतर कोणताही उद्देश नव्हता चोरांची कबुली. मा.पोलीस अधिक्षक पंकज देशमुख दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०७ मार्च २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे ग्रामीण यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणारी परराज्यातील चौघां जणांची टोळी जेरबंद करून १२ तासांचे आत गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांना यश मिळाले असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या बाबत अधिक माहिती अशी की दिनांक ०५/०३/२०२५ रोजी रात्री १०:३० चे सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सहकार नगर परीसरातील निळकंठेश्वर मंदिरा जवळील विश्वजीत शशिकांत चव्हाण यांच्या राहते घगत तीन इसमांनी अनधिकृतपणे प्रवेश करून घरातील दोन पुरुष व दोन महिलांना जबरी मारहाण करणेत आली व सोन्याचे दागिने चोरी करणेत आलेले आहेत असे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बोलताना सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत विश्वजीत शशिकांत चव्हाण वय ३३ वर्षे हे मयत झालेले असून इतर तीन इसम हे गंभीर जखमी झाले असून सदर प्रकारा बाबत यवत पोलीस स्टेशन येथे गु नं २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३, १०९, ३३३, ३(५) प्रमाणे दि.०६/०३/२०२५ रोजी सारीका विश्वजीत चव्हाण यांचे फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे. सदर घटनेची व गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास सुरू करणेत आला होता, गुन्हयाचे ठिकाणी मा पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी भेट देवून गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून यवत पोलीस स्टेशन येथील दोन पथके, स्थानिक गुन्हे शाखेची पाच पथके तयार करून. आरोपी शोध मोहीमेची सुत्र फिरवून १२ तासांच्या आत सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचे अनुषंगाने नेमलेल्या तपास पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, घटनास्थळाचा परिसर हा दुर्गम असल्याने सीसीटीव्हीचा अभाव होता, घटना घडल्या नंतर फिर्यादी यांनी परिसरातील लोकांना संपर्क साधुन मदतीस बोलाविले तेव्हा त्यांच्या मदतीला दोघे जण मोटर सायकल वर धावून आले असल्याने बाथरुममध्ये लहान मुलांना घेऊन बसलेल्या महिलेचा देखील जीव वाचला आहे मदतीला आलेल्या दोन व्यक्तींनी चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरटे कॅनॉलचे दिशेने रेल्वे रूळाकडे पळून गेल्याचे सांगितले. सदर व्यक्तींकडे केलेल्या चौकशीच्या अनुषंगाने त्या परिसरात शोध घेतला असता आरोपी पळून गेलेल्या भागात एक संशयित बॅग मिळून आली. त्यामध्ये कपडे व इतर साहित्य मिळाले असून एका जर्कंगवर युनिव्हर्सिटी दिल्ली असे लिहीलेले होते. त्या आधारे आरोपी हे उत्तर भारतातील असल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान चार संशयित इसम हे पुणे स्टेशन कडे गेल्याचे गोपनीय बातमी दाराकडून माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे तसेच ट्रॅव्हल्स स्टॉपवर आरोपींचा शोध घेत असताना येरवडा परिसरातील गुंजन थेटर चौकातील ट्रॅव्हल्स स्टॉपवर दोन संशयित इसम मिळून आले, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता हालचाल करू लागल्याने त्यांना ताब्यात घेवून विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव १) सलमान दिलशाद शेख वय २८ वर्षे रा.पठाणकोट मोहल्ला, हुश मस्जिद जवळ, बडौत ता. जि. बागपथ राज्य उत्तर प्रदेश. २) मोमीन अकबर शेख वय-४५ रा.पठाणकोट मोहल्ला, हुश मस्जिद, जवळ बडौत ता. जि. बागपथ राज्य-उत्तर प्रदेश अशी नावे त्यांनी सांगितले असून त्यांनी त्यांचे साथीदार नामे ३) रावतसिंग चौधरी जगदेवसिंग तोमर वय २६ धंदा- रा. बडौत जि. बागपथ राज्य उत्तर प्रदेश ४) गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान वय-२५ धंदा-गुराळ कामगार रा. काशीराम कॉलनी बडौद ता.जि बागपथ राज्य- उत्तर प्रदेश यांचे मदतीने नमुद गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच यातील इतर दोन आरोपी रावतसिंग चौधरी व गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान हे घटनास्थळाच्या परिसरात त्यांची पडलेली बॅग शोधायला गेले असल्याचे सांगितल्याने त्यांना शोधण्यासाठी यवत पोलीस स्टेशनचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना करून त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पंकज देशमुख यांनी बोलताना सांगितले. सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री.पंकज देशमुख पुणे ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.गणेश बिरादार श्री.बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिाकारी दौंड उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल गावडे, सपोनि दत्ताजीराव गावडे, सपोनि कुलदीप संकपाळ, यवत पोलीस स्टेशनचे सपोनि प्रवीण सपांगे, मसपोनि सुवर्णा गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई अभिजीत सावंत, पोसई अमित सिद-पाटील, यवत पोलीस स्टेशन कडील पोसई किशोर वागज, पोसई सलीम शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. फौजदार ईश्वर जाधव, हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, असिफ शेख, महेश बनकर, अतुल फरंदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, विजय कांचन, अभिजीत एकशिंगे, राहुल पवार, राहुल मुंबे, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, रणजित कोंडके, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, सागर नामदास, तुषार भोईट, पोलीस अमंलदार मंगेश भगत, निलेश शिंदे, अजय घुले बिभीषण सस्तुरे तसेच यवत पोलीस स्टेशन कडील अमंलदार गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यांदव, दत्ता त्रय काळे, विकास कापर, गणेश कुतवळ, विशाल जावळे, प्रमोद गायकवाड, मारुती बाराते, प्रणव ननवरे यांचे पथकांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!