By : Polticalface Team ,07-03-2025
पुणे: जगभरातील नामांकित आणि भारतातील अग्रस्थानी असलेल्या 23 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोहित फिल्म्स बारामती प्रस्तुत आणि विजय श्रीरंग खुडे लिखित व दिग्दर्शित ‘गिरान’ या मराठी चित्रपटाची "मराठी फिल्म कॉम्पिटिशन" साठी निवड करण्यात आली.
या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी सुमारे 1,500 चित्रपटांमधून फक्त सात चित्रपटांची निवड झाली, ज्यामधून पाच चित्रपटांना पारितोषिके मिळाली. विशेष म्हणजे, ‘गिरान’ या चित्रपटाला "ज्युरी स्पेशल मेंशन - डेब्यू बेस्ट अॅक्ट्रेस" हा मानाचा पुरस्कार मिळाला.
मातंग समाजातील एका प्रथेवर आधारित या चित्रपटात प्रमुख भूमिकेत भक्ती घोगरे झळकली आहे, तर मुख्य अभिनेता म्हणून रवींद्र पालखे यांची भूमिका आहे. सहाय्यक भूमिकांमध्ये फैजल सय्यद, छाया अडत, साधना काशीद, काजल खरात, अतुल साबळे, मुकुंद काळे, ज्ञानोबा म्हस्के, नागेंद्र माकर, रुपेश गाडेकर आणि अभिषेक कुचेकर यांनी अभिनय केला आहे.
चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंसाठी नावाजलेल्या तज्ज्ञांनी योगदान दिले आहे:
यापूर्वीही ‘गिरान’ चित्रपटाने प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये "बेस्ट फिल्म" पुरस्कार, तसेच कोल्हापूर चित्रनगरीत "बेस्ट अॅक्ट्रेस" आणि "बेस्ट डायलॉग" या पुरस्कारांनी चित्रपट सन्मानित झाला आहे.
‘गिरान’ हा चित्रपट सामाजिक वास्तव दर्शवणारा असून, त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
वाचक क्रमांक :