के पी जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे बारावीच्या परीक्षा केंद्रावर संपूर्ण परीक्षा सुरळीत संपन्न
By : Polticalface Team ,11-03-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) के.पी. जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या इयत्ता बारावीच्या परीक्षा केंद्रावर संपूर्ण परीक्षा अतिशय शांततेत व सुरळीत पार पडली.
श्री व्यंकनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोणी व्यंकनाथ;. श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वांगदरी;. सनराइज् कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स श्रीगोंदा; आणि के.पी जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे या सर्व महाविद्यालयाचे मिळून एकूण 294 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. एकूण 16 पेपर या परीक्षा केंद्रावर सुरळीत व शांततेच्य वातावरणात पार पडले. या परीक्षा दरम्यान श्रीगोंदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री सत्यजित मच्छिंद्र; शिक्षण विस्तार अधिकारी श्री निळकंठ बोरुडे; श्री. भुजबळ तर शिक्षणाधिकारी श्री अशोक कडूस; श्री. सरोदे यांनी परीक्षा काळात परीक्षा केंद्रास भेटी दिल्या.
श्री व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ चे प्राचार्य श्री पुराणे आनंदा सर हे केंद्र संचालक तर के पी जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री जालिंदर मोहिते सर हे सहाय्यक केंद्रसंचालक यांनी परीक्षेचे कामकाज पाहिले. श्री संदीप देवकर सर; सौ संतोषीनी लबडे मॅडम, नलावडे मॅडम घाडगे सर, बडदे सर शेख सर,रायकर मॅडम,कलगुंडे मॅडम काम केले. श्री सचिन लगड सर यांनी केंद्राच्या वतीने सहाय्यक परिरक्षक म्हणून काम पार पाडले. उत्कृष्ट परीक्षा पार पाडल्या बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन जाधव सर व संस्थेच्या सचिव डॉ. शुभांगी जाधव मॅडम यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :