By : Polticalface Team ,11-03-2025
श्रीगोंदा भूमी अभिलेख उपाधीक्षक सुहास जाधव यांनी या चळवळीचा आदर्श घेत मोजणी अधिकारी वासुदेव पाटील यांची विशेष नियुक्ती केली आहे. शिवपानंद नकाशावरील रस्ते हा शेतकरी आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे शासनाच्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे श्रीगोंदा तालुका "रोड मॉडेल" म्हणून उभा करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले गेले आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शिंगाडे, देशमुख, वेखंडे, औताडे आणि श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. राज्यभरातील भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी याच धर्तीवर निर्णय घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व शेत रस्ते खुल्या होण्यास वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
▶ शिवपानंद शेत रस्ते मोजणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाले असून, तहसील व भूमी अभिलेख कार्यालय या कामी प्रयत्नशील आहेत.
▶ शासकीय नियमानुसार मोजणी सुरू असल्याने कोणत्याही शेतकऱ्यांनी या कामात अडथळा आणू नये.
▶ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.
- श्रीगोंदा भूमी अभिलेख उपाध्यक्ष सुहास जाधव
▶ श्रीगोंदा तालुक्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक तालुका "रोड मॉडेल" म्हणून दिशादर्शक ठरावा, यासाठी राज्यस्तरीय प्रयत्न सुरू आहेत.
▶ लवकरच या चळवळीला संपूर्ण महाराष्ट्रात यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
- प्रणेताः शरदराव पवळे, दादासाहेब जंगले पाटील (राज्य समन्वयक)
शिवपानंद शेत रस्ते चळवळ, महाराष्ट्र राज्य