दौंड शहर गांधी चौक येथील जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी चौघांन विरुद्ध गुन्हा दाखल 1 हजार 400 रुपये मुद्देमाल केला जप्त.
By : Polticalface Team ,16-03-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १६ मार्च २०२५ दौंड शहरातील गांधी चौक येथील एका बंद घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांनी दि १३ मार्च २०२५ रोजी दुपारी १२:२० वाजे दरम्यान जुगार अड्ड्यावर छापेमारी झाली असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, मौजे दौंड ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत गांधी चौक येथील एका बंद घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही इसम स्वतःचे फायदे करिता 52 पत्याची रम्मी नावाचा जुगार पैसे लावून खेळत व खेळवित आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यांने त्यांनी दौंड पोलीस स्टेशन येथेल पोलीस हवालदार शेख. पोलीस हवालदार बोराडे. हे पोलीस स्टेशनला हजर असताना सदर मिळालेल्या माहिती नुसार कार्यवाही करण्या बाबत पोलीस स्टाफला आदेश दिले. या वेळी
तत्काळ पोलीस हवालदार शेख यांनी व पोलीस स्टाप सह दौंड शहरातील गांधी चौक येथील चालू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला असता या ठिकाणी 4 इसम हातात पंत्ते घेवुन गोलाकार बसुन त्यांचे मध्ये पत्याचा डाव व पैसे मांडुन पत्यांवर जुगार खेळत असताना जागीच पकडुन त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मुन्ना इकबाल शेख वयं 34 वर्षे रा. गांधीचौक दौंड ता.दौंड जि.पुणे 2) दत्तात्रय शाम भालेराव वय 26 वर्षे इंदिरा नगर दौंड ता. दौंड जि. पुणे 3) शुभम भीमसेन वांभिरे वय 26 वर्षे रा.लक्ष्मी नगर दौंड ता. दौंड जि.पुणे 4) आकाश फकीरअप्पा मॅगनकेरी वय 29 वर्षे रा.खाटीक गल्ली दौंड ता.दौंड जि.पुणे अशी सांगितली आहेत
फिर्यादी संजय बबन कोठावळे पोलीस कान्टेबल दौंड पोलीस स्टेशन,पुणे ग्रामीण. यांनी सरकार तर्फे सदर आरोपींन विरुद्ध दौड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 212/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले
1) मुन्ना इकबाल शेख वय 34 वर्षे रा. गांधीचौक दौंड ता. दौंड जि. पुणे 2) दत्तात्रय शाम भालेराव वय 26 वर्षे इंदिरानगर दौंड ता. दौंड जि. पुणे 3) शुभम भीमसेन वांभिरे वय 26 वर्षे रा. लक्ष्मीनगर दौंड ता. दौंड जि.पुणे 4) आकाश फकीरअप्पा मॅगनकेरी वय 29 वर्षे रा. खाटीकगल्ली दौंड ता. दौंड जि.पुणे असे सांगितले. त्यांचे ताब्यात खालील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे,
1) 1300 रु रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपये किंमतीची 01 नोट, 200 रुपये दराची 01 नोट,100 रुपये दराच्या 05 नोटा, 50 रुपये दराच्या 02 भारतीय चलणाच्या नोट 2) 100/- दराचे एकुण 52 पत्यांचे एकुण दोन पत्यांचे कॅट प्रत्येकी 50 रुपये कि. दराप्रमाणे. येणे प्रमाणे एकुण 1 हजार 400 रुपये मुद्देमालाचा पंचनामा करून ताब्यात घेतला असुन वरील आरोपींन विरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पोलीस हवालदार लोहार. पोलीस हवालदार पांढरे पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.
श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके
लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट