दौंड शालीमार चौकामध्ये बेकायदा कल्याण मटका जुगार.पैसे घेऊन लोकांना मटका खेळणाऱ्या इसमावर पोलीसांनी केली कारवाई
By : Polticalface Team ,19-03-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १९ मार्च २०२५ दौंड शहरातील शालीमार चौकामध्ये बेकायदा अवैध कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या इसमावर दौंड पोलीसांनी कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये मिळून आलेल्या आरोपीचे नाव विल्यम अतोंनी आरीकम वय 63 वर्षे रा दत्त मंदिर दौंड ता दौंड जि पुणे असे नमूद करण्यात आले आहे. दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अमीर जिलानी शेख पोलीस हवालदार नेमणुक दौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण सरकार तर्फे गु.र.नं 224/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार आरोपी. विल्यम अतोंनी आरीकम याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की दौंड शहरातील शालीमार चौकामध्ये असलेल्या दत्त मंदीर जवळ इसम नामे विल्यम अतोंनी आरीकम हा बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नावाची जुगाराची साधने बाळगून लोकांकडून पैसे घेउन त्यांना खुलेआम जुगार खेळवीत असताना दौंड पोलीसांनी त्याला ताब्यात घेतला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शालीमार चौकामध्ये बेकायदा कल्याण मटका जुगार खेळवीत होता हि कारवाई दि.18/03/2025 रोजी 12.30 वा.चे सुमारास मौजे दौड गावचे हद्दीत दत्त मंदिर शालीमार चौक ता दौड जि पुणे या ठिकाणी दौंड पोलीसांनी केली आहे.
या कारवाई मध्ये रंगेहाथ मिळून आलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे. 860 रू रोख रक्कम 100 रू दराची 7 नोटा, 50 रू दराची 3 नोटा 10 रू दराची 1 नोट. एक निळ्या रंगाचा बॉल पेन. एक स्लिपबुक त्यावर मटका व जुगाराचे आकडे लिहिलीले एकुण 865 रुपये वरील प्रमाणे माल मिळून आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे
ता.18/03/2025 रोजी 12.30 वा.चे सुमारास मौजे दौड गावचे हददीत दत्त मंदीर शालीमार चौक ता दौड जि पुणे येथे इसम नामे विल्यम अतोंनी आरीकम वय 63 वर्षे रा दत्त मदीर दौड ता दौड जि पुणे यांनी आपले कब्जात बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नावाची जुगाराची साधने व रोख रक्कम 865/-रुपये किमतीचा मुद्देमाल जुगाराची साधने जवळ बाळगून आपले ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना जुगार खेळवीत असताना मिळून आला असल्याचे कारणा वरून सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे पोलीस हवालदार ढुके पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :