क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने. दौंड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची मीटिंग संपन्न. (बेकायदा अवैध धंदे बंद करा)

By : Polticalface Team ,11-04-2025

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने. दौंड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची मीटिंग संपन्न. (बेकायदा अवैध धंदे बंद करा) दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १० एप्रिल २०२५ रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे सायंकाळी सहा वाजता दौंड पोलीस प्रशासनाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने सार्वजनिक स्थानिक शांतता कमिटी मीटिंगचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. मा.श्री बापूराव दडस,उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांची शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. सदर मीटिंग मध्ये मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड यांनी दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी प्रत्येक नागरिकांना व मंडळाच्या पदाधिकारी यांना वाहतुक, मिरवणूक, बॅनर व वाद्य बाबत सूचना दिल्या आहेत. तसेच सदर मिरवणुकी मध्ये व जयंती उत्सवामध्ये लहान मुले, मुली व महिला यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येकाने स्वतः जबाबदारी घेऊन इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. महिला व मुली यांच्या विषयी अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक श्री गोपाळ पवार यांनी उपस्थित भीम अनुयाया यांच्याशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले जयंती उत्सव निमित्त प्रत्येक नागरिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार आत्मसात करून आचरणात आनावा त्याचे पालन करावे. हा जयंती उत्सव शांततेत पार पाडने ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असुन जयंती उत्सव साजरा करावा असे त्यांनी बोलताना सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले यापूर्वी जयंती उत्सवा मध्ये ज्या इसमान विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत अशा इसमान वरती हद्दपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (पोलीस विभागाच्या मार्फतीने दौंड पोलीस स्टेशन येथे सर्व नागरिकांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी वाचन केंद्र विशेष उपक्रम ठेवण्यात येणार आहे. दौंड शहरातील युवा तरुण महिला व मुलींनी वाचनामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दौंड तालुका ग्रामीण व शहरातील बेकायदेशीर असलेल्या अवैध धंदे तत्काळ बंद करा अन्यथा चालक-मालक यांच्या विरुद्ध धडक कारवाई केली जाईल या मोहिमे बाबत विशेष पोलीस पथकांची टिम नेमण्यात येणार असल्याचे मा.श्री बापूराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

शिक्षक भारती अहिल्यानगर सहविचार सभा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात संपन्न

गांळप हंगामा करीता 16 ऊस तोड कोयते (32 मजुर) 16 बैल गाड्या (32 बैल) पुरवतो. असा करार करून १८ लाख रुपयांची फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध

पत्रकार कुरुमकर यांचा लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व सेवा संस्थेकडून सन्मान

दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा

विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा

यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान

श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटसह पाऊस काही तास जनजीवन विस्कळीत , वीज कोसळल्याने पिसोरेखांड येथे दोन म्हशींचा बळी!

संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

दौंड महसूल प्रशासनाने तालुका लोकशाही दिनाचे केले आयोजन. नागरीकांच्या अडी अडचणी तत्काळ सोडवण्याचे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार.

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय

कुरुमकर परिवारातील ज्येष्ठ माता कै.जिजाबाई कुरुमकर यांचे निधन

फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.

निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा

10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण

नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.