विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप व भिम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
By : Polticalface Team ,12-04-2025
जुने पेडगाव (ता. श्रीगोंदा) — विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भीमक्रांती मित्रमंडळ पेडगाव (ता. श्रीगोंदा) यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुने पेडगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, तसेच भिम मॅरेथॉन या धावण्याच्या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.
या वेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रंगीत खडू, वह्या, ड्रॉईंग बुक आदी साहित्य देण्यात आले. त्याचबरोबर आरोग्य व तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देणारी भिम मॅरेथॉन स्पर्धाही मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमास भीमक्रांती मित्रमंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत आजी माजी सदस्य, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेत समाजसुधारणेसाठी पुढाकार घेण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाचे नियोजन भीमक्रांती मित्रमंडळ पेडगाव यांच्या सौजन्याने करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शाळेचा सहभाग आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक ऐक्य, शिक्षणप्रेम व आरोग्यविषयक जाणीव वाढीस लागल्याचे आयोजकांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
शिक्षक भारती अहिल्यानगर सहविचार सभा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात संपन्न
गांळप हंगामा करीता 16 ऊस तोड कोयते (32 मजुर) 16 बैल गाड्या (32 बैल) पुरवतो. असा करार करून १८ लाख रुपयांची फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध
पत्रकार कुरुमकर यांचा लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व सेवा संस्थेकडून सन्मान
दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती
विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा
विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा
यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान
श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटसह पाऊस काही तास जनजीवन विस्कळीत , वीज कोसळल्याने पिसोरेखांड येथे दोन म्हशींचा बळी!
संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला
दौंड महसूल प्रशासनाने तालुका लोकशाही दिनाचे केले आयोजन. नागरीकांच्या अडी अडचणी तत्काळ सोडवण्याचे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार.
इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय
कुरुमकर परिवारातील ज्येष्ठ माता कै.जिजाबाई कुरुमकर यांचे निधन
फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.
निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा
10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण
नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.