भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयतीच्या निमीत्ताने. पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश बंदी.
By : Polticalface Team ,13-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
पुणे ता १३ एप्रिल २०२५ भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश बंद असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे
दिनांक १४/०४/२०२५ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव प्रामुख्याने पुणे शहरातील खडकी, विश्रांतवाडी, येरवडा व बंडगार्डन या भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्यामुळे पुणे शहरातील व ग्रामीण भागातील भीम अनुयाया डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व वंदन करण्यासाठी नागरिकांची सतत वर्दळ दिसून येते
त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याची दक्षता घेऊन पोलीस प्रशासनाने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जड वाहतूकीस बंदी असल्याचे सुचना देण्यात आल्या आहेत
खडकी, विश्रांतवाडी, येरवडा व बंडगार्डन या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोठया प्रमाणात भीम अनुयायांची गर्दी होत असते. यामुळे वाहतूकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी वरील ठिकाणी वाहतुकीतील बदल करण्यात आले असल्याचे पुणे पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
दिनांक १३/०४/२०२५ रोजी रात्री २३:०० वा. पासुन ते दिनांक १४/०४/२०२५ रोजीचे २४:०० वाजे पर्यंत पुणे शहर अंतर्गत व बाहेरून प्रवेश करणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) प्रवेश बंद करण्यात आला असल्याचे सुचना दिल्या आहेत त्याच प्रमाणे
पुणे ग्रामिण हद्दीतुन बोपखेल, सोलापुर रोड, नगर रोड, देहू रोड या मार्गाने मोठ्या प्रमाणावर पुणे शहरामध्ये अवजड वाहतूक येते. सदर वाहनांना पुणे शहराकडे न पाठवता आपल्या हद्दीतून पुणे शहराकडे येणाऱ्या वाहतुकीला इतर मार्गाने मार्गस्थ करावे. अशी सोय व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून सदर वाहतूक बदलाचे नियोजन ग्रामीण भागातून आपले स्तरावर व्हावे, असे नमूद करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :