By : Polticalface Team ,17-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १४ एप्रिल २०२५ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त संविधान स्तंभ संवर्धन समिती दौंड आयोजित भीम गीतांचा जंगी कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रस्तुत करता राजू भालसेन व स्वाती पुणेकर, प्रमुख आकर्षण राखी चौरे व बाबा गाडे व त्यांचे सर्व टीम मंगळवार दिनांक: 08/04/2025 रोजी सायं.7 वाजता संत गाडगे महाराज चौक संविधान स्तंभ दौंड पोलीस स्टेशन समोर आयोजित केला करण्यात आला होता
या कार्यक्रमासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सौं सुप्रिया ताई सुळे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती. यावेळी दौंड तालुक्याचे माजी आमदार मा.रमेशआप्पा थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष मा.आप्पासाहेब पवार, प्रामुख्याने उपस्थित होते. महिला अध्यक्षा मा.सौ योगिनीताई दिवेकर, दौंड पंचायत समितीचे उपसभापती मा.विकास कदम मा.राजेंद्र खटी, मा.बादशहा भाई शेख. मा.संभाजी ताकवणे मा.नंदू महाराज बनसोडे, मा.नरेश डाळींबे आदी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
दौंड शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज. संत गाडगेबाबा या महापुरुषांच्या पुतळ्यास तसेच संविधान स्तंभ या स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर १४ एप्रिल २०२५ जयंती उत्सव संविधान स्तंभ संवर्धन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती व आयोजक, निमंत्रक, अध्यक्ष दिपकभाऊ सोनवणे यांनी दिली
महिला अध्यक्षा मा.सौ योगिनीताई दिवेकर, दौंड पंचायत समितीचे उपसभापती मा.विकास कदम मा.राजेंद्र खटी, मा.बादशहा भाई शेख. मा.संभाजी ताकवणे मा.नंदू महाराज बनसोडे, मा.नरेश डाळींबे आदी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच दौंड तालुका ग्रामीण भागातील भिम सैनिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
वाचक क्रमांक :