By : Polticalface Team ,17-04-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाकडून नुकताच ग्रामीणचा उत्कृष्ट पुरस्कार देऊन राष्ट्र सह्याद्रीने समूहाने सन्मान केल्याबद्दल तसेच बेलवंडी येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र खेडकर यांना नुकतीच रयत शिक्षण संस्थेने पदोन्नती दिल्याबद्दल या दोन्हीही मान्यवरांचा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसोडे व सचिव डॉ अमोल झेंडे यांनी श्रीगोंदा येथे सन्मान केला.
यावेळी शुभेच्छापर भाषणात पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसोडे म्हणाले की; ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर हे आमचे परममित्र व पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी व मार्गदर्शक म्हणून आहेत त्यांचे पत्रकार संघाला देखील मौलिक असे मार्गदर्शन मिळत आहे. कुरुमकर यांनी आपल्या पत्रकारिता क्षेत्रात जवळपास 27 वर्ष योगदान दिले आहे. समाजाच्या प्रलंबित प्रश्नासाठी कुरुमकर यांनी आपल्या पत्रकारितेचा उत्तम लेखणीतून एक वेगळा ठसा उमटल्याचे सांगून श्री बनसोडे यांनी पत्रकार कुरुमकर व प्राचार्य खेडकर यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी शुभेच्छा देताना पत्रकार संघाचे सचिव डॉ अमोल झेंडे यावेळी म्हणाले की; प्राचार्य राजेंद्र खेडकर व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचे शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रभावी असून; ज्ञानदानाच्या कार्यात या दोन्हीही सन्मानअर्थींचा प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडींमध्ये सहभाग असतो. या दोन्ही मान्यवरांना श्री झेंडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी पत्रकार संघाचे वैभव हराळ; पत्रकार पिटर रणसिंग आदी यावेळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :