By : Polticalface Team ,18-04-2025
श्रीगोंदा - बहुजन महापुरुषांचा संघर्ष हा समाजाच्या उत्थानासाठी होता. फुले-शाहू-आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केले तर देश व समाज विकसित होईल. जाती, धर्म व पंथांच्या भिंती पाडून एक माणूस म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते सचिन झगडे यांनी केले. इम्पा संघटनेच्या वतीने राजनंदिनी काष्टी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात झगडे बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र कदम होते.
झगडे पुढे म्हणाले बहुजन महापुरुषांचा संघर्ष हा समाजाच्या उत्थानासाठी होता. हजारो वर्षांच्या संघर्षानंतर सुशिक्षित पिढी निर्माण झाली आहे. आणि या पिढीत डॉक्टर, इंजिनीयर, वकील निर्माण झाले आहेत. त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केले तर देश, समाज विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. जाती, धर्म व पंथांच्या भिंती पाडून माणूस म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. आज समाजामध्ये धर्म, पंथ व जातीच्या भिंती उभ्या करून भांडण लावण्याचे षडयंत्र चालू आहे. या षडयंत्राला बळी पडायचे नसेल तर महापुरुषांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा समाजाचा विनाश निश्चित आहे. पुन्हा फुले-शाहू-आंबेडकर निर्माण होणार नाहीत म्हणून मैत्री भावाने एकत्र राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे झगडे यांनी सांगितले.
उल्लेखनीय काम करणाऱ्यांना इम्पा च्या वतीने दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षी जीवन गौरव 2025 या पुरस्काराचे मानकरी दौंड येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. डी.एस. लोणकर, सर्जन जयराम सोनोने व श्रीगोंदा येथील डॉ. उत्तम वडवकर हे ठरले आहेत. इम्पा चे तालुकाध्यक्ष डॉ. राजेश पाखरे यांच्या हस्ते व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन पुरस्कारार्थींना गौरवण्यात आले. नेत्रदान चळवळीत उल्लेखनीय काम केल्याबद्दल डॉ. प्रेमकुमार भट्टड यांना गौरविण्यात आले तर मॅरेथॉन स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. रोहन खवटे यांचा गौरव व विशेष सन्मान करण्यात आला. त्याप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. रजनीकांत गायकवाड, आहारतज्ज्ञ राजेश दाते व वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन भोसले यांचाही विशेष सत्कार करून गौरवण्यात आले. त्याप्रमाणेच आदर्श शिक्षिका सौ. स्वाती दिलीप काळे यांचा व धनुर्विद्या स्पर्धेत विशेष प्राविण्य गाजवलेल्या ऋतुपर्ण साबळे या खेळाडूचा देखील सत्कार करण्यात आला.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्याच्या पाठीवर नेहमीच इम्पा च्या वतीने शाब्बासकीची थाप टाकण्यात येते, प्रोत्साहन देण्यात येते, पुरस्कार देण्यात येतात. संघटनेच्या वतीने हे अखंड चालू राहील असे इम्पा चे अध्यक्ष डॉ. राजेश पाखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
डॉ. डी.एस. लोणकर यांनी आपल्याला हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मिळाला असल्याने हा माझ्यासाठी अनमोल पुरस्कार आहे, सदा स्मरणात राहील व या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे नमूद केले. कार्यक्रमास डॉक्टर संजय टकले, पांडुरंग दातीर, गणेश बारगळ, निलेश कपिल, ज्ञानेश्वर दातीर, देविदास थोरात, नवनाथ कोल्हटकर, अनिल कोकाटे, यशवंत चव्हाण, संतोष मोटे, विक्रम कसरे, संजय कोकाटे, प्रवीण जंगले, विजय लाळगे, चेतन साळवे, डॉ. सौ. किरण पवार, वैशाली टकले, सुप्रिया पाखरे, विद्या दातीर, तृप्ती गायकवाड, सिमरन पाखरे, आदींसह संघटनेचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते रफिक इनामदार, सुनील पाचपुते, कुसाळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रमोद गायकवाड यांनी केले तर डॉ. बाळासाहेब पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष